Terrorist Attack In Poonch| जम्मू आणि काश्मीरच्या पूंछ जिल्ह्यात शनिवारी दहशतवाद्यांनी भारतीय वायुसेनेच्या वाहनांवर गोळीबार करण्यात आला. या हल्ल्यात एक जवानाचा मृत्यू झाला असून पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. सुरनकोट भागातील सनई टॉपकडे वाहने जात असताना सायंकाळी हा हल्ला झाला. या हल्ल्याचा काँग्रेसने नेते राहुल गांधी यांनी निषेध केला आहे. राहुल गांधी यांनी ‘एक्स’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर प्रतिक्रिया दिली आहे.
राहुल गांधी काय म्हणाले ? Terrorist Attack In Poonch|
“जम्मू-काश्मीरमधील पुंछमध्ये लष्कराच्या ताफ्यावर झालेला भ्याड दहशतवादी हल्ला अत्यंत लज्जास्पद आणि दुःखद आहे. शहीद झालेल्या जवानाला मी विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो आणि त्यांच्या दुखात आम्ही जवानांच्या कुटुंबियांबरोबर आहोत. तसेच या हल्ल्यात जखमी झालेल्या जवानांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी अशी मी आशा करतो.” असे राहुल गांधी म्हणाले.
जम्मू कश्मीर के पुंछ में हमारी सेना के काफिले पर कायराना और दुस्साहसी आतंकी हमला बहुत ही शर्मनाक है, दुखद है।
शहीद जवान को मैं अपनी विनम्र श्रद्धांजलि अर्पित करता हूं और उनके शोकसंतप्त परिजनों को संवेदनाएं व्यक्त करता हूं। हमले में घायल जवानों के जल्द से जल्द स्वस्थ होने की आशा…
— Rahul Gandhi (@RahulGandhi) May 4, 2024
मल्लिकार्जून खरगे काय म्हणाले ?
याशिवाय काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांनीही ‘एक्स’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर प्रतिक्रिया दिली आहे. “जम्मू-काश्मीरच्या पूंछमध्ये भारतीय वायुसेनेच्या ताफ्यावर झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याने वृत्त ऐकून दुःख झाले. मी या दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध करतो. दहशतवादाविरुद्ध या लढाईत आम्ही एकत्रित उभे आहोत. या हल्यात शहीद झालेल्या जवानाच्या कुटुंबियांप्रती मी संवेदना व्यक्त करतो,” असे ते म्हणाले. Terrorist Attack In Poonch|
दरम्यान, या हल्ल्यानंतर राष्ट्रीय रायफल्सच्या एका तुकडीने परिसरात शोध मोहीम सुरू केली आहे, अशी माहिती एएनआय या वृत्तसंस्थेकडून देण्यात आली आहे.
हेही वाचा:
डोप टेस्ट न दिल्याने बजरंग पुनिया निलंबित, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये जाण्याच्या आशांना लागू शकतो ‘ब्रेक’