पुणे – संपूर्ण पुणे शहर कचरामुक्त करण्यासाठी आज (दि. २८) शहरात ठिकठिकाणी ‘प्लॅागेथाॅन २०२०’ चे आयोजन करण्यात आले. सकाळी ७ वाजताच्या सुमारास या मोहिमेला सुरुवात झाली. शहरातील मुख्य रस्ते, उद्याने, शालेय परिसर आणि नदी किनारा या ठिकाणी प्लॅागेथाॅनचे आयोजन करण्यात आले.
यामध्ये नगरसेवक सिद्धार्थ धेंडे, प्रभाग समितीचे स्वीकृत सदस्य चंद्रकांत जंजिरे, वरिष्ठ आरोग्य निरीक्षक संजय घावटे, आरोग्य निरीक्षक अमोल म्हस्के, संदीप पवार, शालेय विद्यार्थी, शहरातील नागरिक आणि सफाई कामगार यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता.