Pro-Kabaddi League Pune – प्रो-कबड्डी लीगमध्ये बुधवारी झालेल्या लढतीत जयपूर पिक पॅंथर्स संघाने युपी योद्धा संघाचा ४१-२४ असा पराभव करत धडाकेबाज विजयाची नोंद केली. या स्पर्धेच्या या तिसर्या आठवड्याची अखेर होती. आता या स्पर्धेतील चौथ्या आठवड्याचे सामने चेन्नईत रंगणार आहेत.
पिंक पैंथर्स की धमाकेदार तीसरी जीत 🔥
यूपी योद्धाज़ को 4️⃣1️⃣-2️⃣4️⃣ से हराकर हासिल की बड़ी जीत 💪🩷#ProKabaddiLeague #ProKabaddi #PKLSeason10 #PKL #HarSaansMeinKabaddi #JPPvUP #JaipurPinkPanthers #UPYoddhas pic.twitter.com/2KoAbFnaxA
— ProKabaddi (@ProKabaddi) December 20, 2023
हा सामना सुरु झाल्यापासू जयपूर पिंक पॅंथर्स संघाने सातत्याने वर्चस्व राखले. त्यांनी पहिल्या सत्रातच २४ विरुद्ध ९ अशी भक्कम आघाडी घेतली. या सामन्यात युपी योद्धा संघाचा तो जोश दिसतच नव्हता. त्यांच्या खेळाडूंना पकडीही यशस्वी करता येत नव्हत्या. जयपूरच्या अर्जुन देशवाल व सुनील कुमार यांनी अफलातून लोण चढवले तसेच प्रतिस्पर्धी खेळाडूंच्या पकडीही अप्रतीम केल्या. त्यांच्या धडाक्यासमोर युपी योद्धा संघ नवख्या संघासारख गोंधळलेला वाटला.
दुसरे सत्र सुरु झाल्यावर युपी संघाने सलग चार गुण मिळवताना जिद्दी खेळाचे दर्शन घडवले मात्र, तरीही जयपूर संघाची आघाडी कमी करणे त्यांना शक्य होत नव्हते इतका आक्रमक खेळ जयपूरचे खेळाडू करत होते. युपीचे स्टार खेळाडू प्रदीप नरवाल व विजय मिक यांना सुरच गवसत नव्हता. त्यांना आलेले अपयशच युपी संघाला चांगलेच भोवत होते. रेड व टॅकल गुणांमध्येही जयपूर संघानेच सातत्याने बाजी मारली होती.
#PKLSeason10 (#HSvGG Match 31) : हरियाणा स्टीलर्सचा गुजरात जायंट्सवर अवघ्या 2 गुणांनी विजय…
दुसरे सत्र संपण्यापूर्वी युपी संघाने आक्रमक खेळ करत पिछाडी भरून काढण्याचा अटोकाट प्रयत्न केला. सुरेंद्र गिलने सरस खेळ करत जयपूरवर दडपण आणण्याचेही डावपेच यशस्वी केले. अखेरच्या काही मिनिटाता जयपूरचा रिझा मिरबघेरीने अफलातून खेळ करत संघाची आघाडी वाढवली. रीझासह सुरेख खेळ करत जयपूरच्या अर्जुन देशवालने तब्बल १३ गुणांची कमाई करत सामन्यातील विजयात मोलाचा वाटा उचलला.