Pro Kabaddi 2023 : प्रो कबड्डी च्या 31 व्या सामन्यात हरियाणा स्टीलर्सने गुजरात जायंट्सचा पराभव केला. हरियाणा संघाने हा सामना 31-29 असा जिंकला असून या मोसमातील त्यांचा हा सलग चौथा विजय आहे. PKL 2023 च्या गुणतालिकेत ते तिसऱ्या स्थानावर आले आहेत आणि गुजरात संघ चौथ्या स्थानावर आला आहे.
गुजरात जायंट्ससाठी प्रो कबड्डीच्या या सामन्यात, रोहितने (7) सर्वाधिक रेड पॉइंट घेतले आणि बचावात, कर्णधार फजल अत्राचलीने सर्वाधिक 4 टॅकल पॉइंट घेतले. हरियाणा स्टीलर्ससाठी, विनयने चढाईत सर्वाधिक 8 गुण घेतले आणि मोहित नंदलने बचावात 5 टॅकल गुण घेतले.
हरियाणा स्टीलर्स ने दर्ज की लगातार चौथी जीत 💪🔥
गुजरात जायंट्स के ख़िलाफ़ धाकड़ छोरों के इस प्रदर्शन को कितने 💙 देंगें आप❓ #ProKabaddiLeague #ProKabaddi #PKLSeason10 #PKL #HarSaansMeinKabaddi #HSvGG #HaryanaSteelers #GujaratGiants pic.twitter.com/Xscsy7pb3e
— ProKabaddi (@ProKabaddi) December 19, 2023
पूर्वार्धानंतर (पहिल्या सत्रानंतर) हरियाणा स्टीलर्सने गुजरात जायंट्सविरुद्ध 17-10 अशी आघाडी घेतली. सुरुवातीला स्टीलर्सचा वरचष्मा होता आणि त्यांनी गुजरात जायंट्सवर दबाव आणला. एकेकाळी गुजरातचे फक्त तीन खेळाडू सक्रिय राहिले होते, येथून जायंट्सने पलटवार करत स्टीलर्सवर वर्चस्व राखण्याचा प्रयत्न केला. सामना बऱ्यापैकी बरोबरीत सुटला आणि दरम्यान हरियाणाने पुन्हा दमदार पुनरागमन केले. पूर्वार्धाच्या अखेरीस गुजरात जायंट्स संघ प्रथमच ऑलआऊट झाला आणि हरियाणा स्टीलर्स संघ लक्षणीय आघाडी घेऊ शकला.
उत्तरार्धात (दुसऱ्या सत्रात) गुजरात जायंट्सने शानदार पलटवार करत हरियाणा स्टीलर्सला ऑलआऊटच्या जवळ नेले. यात रोहित गुलियाच्या सुपर रेडने महत्त्वाची भूमिका बजावली होती. हरियाणा स्टीलर्सनेही 28व्या मिनिटाला प्रथमच ऑलआऊट केले. इथून दोन्ही संघांमध्ये फारसा फरक नव्हता आणि चुरशीची लढत पाहायला मिळाली. स्टीलर्सने महत्त्वाच्या वेळी आघाडी घेत ती शेवटपर्यंत राखण्याचा प्रयत्न केला. गुजरातने सामना रोमांचक केला आणि स्टीलर्सच्या गुणांच्या जवळ पोहोचला. हरियाणा स्टीलर्ससाठी विनय सामन्याच्या शेवटच्या चढाईसाठी गेला. तो बाद झाला असता तर सामना बरोबरीत सुटू शकला असता.
तथापि, विनय केवळ एक सेकंद बाकी ठेवून त्याच्या कोर्टात परतला नाही तर दोन बचावपटूंनाही आऊट केलं. अखेरच्या चढाईत गुजरातने एक गुण निश्चित केला, मात्र हरियाणा संघ विजयाची नोंद करण्यात यशस्वी ठरला. गुजरात जायंट्सला केवळ एका गुणावर समाधान मानावे लागले. PKL 2023 मध्ये अनुभवी प्रशिक्षक मनप्रीत सिंग यांच्या संघाचा हा सलग चौथा विजय आहे आणि गुजरातच्या कर्णधाराची जबरदस्त कामगिरी व्यर्थ गेली.