Pro-Kabaddi League Pune – प्रो-कबड्डी लीगच्या पुण्यात बुधवारी झालेल्या अखेरच्या साखळी व 33 व्या लढतीत पुणेरी पलटण संघाने बंगळुरु बुल्स संघाचा ४३ विरुद्ध १८ असा पराभव केला. या विजयासह पुणेरी पलटण संघाने स्पर्धेतील आपली आगेकूच कायम राखली.
अद्भुत, अविश्वसनीय 🧡🔥
पुणेरी पलटन ने दर्ज की लगातार तीसरी जीत 💪 बेंगलुरु बुल्स को 4️⃣3️⃣-1️⃣8️⃣ से हराया 🚀😎#ProKabaddiLeague #ProKabaddi #PKLSeason10 #PKL #HarSaansMeinKabaddi #PUNvBLR #PuneriPaltan #BengaluruBulls pic.twitter.com/6cp4bkzwzY
— ProKabaddi (@ProKabaddi) December 20, 2023
कर्णधार अस्लम इनामदार, मोहित गोयात व पंकज मोहिते यांनी केलेल्या अफलातून कामगिरीच्या जोरावर पुणेरी पलटण संघाने हा सामना मोठ्या फरकाने जिंकला व आपले वर्चस्व आबाधित राखले.
#PKLSeason10 (#JPPvUP Match 32) : जयपूरचा युपी योद्धावर धडाकेबाज विजय…
दरम्यान, प्रो-कबड्डी लीगमध्ये बुधवारी झालेल्या पहिल्या व 32 व्या लढतीत जयपूर पिक पॅंथर्स संघाने युपी योद्धा संघाचा ४१-२४ असा पराभव करत धडाकेबाज विजयाची नोंद केली. या स्पर्धेच्या या तिसऱ्या आठवड्याची अखेर होती. आता या स्पर्धेतील चौथ्या आठवड्याचे सामने चेन्नईत रंगणार आहेत.