नवी दिल्ली – प्रो-कबड्डी लीगमध्ये बुधवारी झालेल्या लढतीत जयपूर पिंक पॅंथर्सने आपली विजयी आगेकूच कायम राखली. त्यांनी हरियाणा स्टीलर्सवर ४५ विरुद्ध ३४ असा विजय मिळवला. जयपुरचा अव्वल खेळाडू अर्जुन देशवाल विजयाचा शिल्पकार ठरला.
मैट पर जयपुर के जांबाजों के सामने नहीं टिके धाकड़ बॉयज 😍
रोमांचक मुकाबले में दर्ज की धमाकेदार जीत 💥#ProKabaddiLeague #ProKabaddi #PKLSeason10 #PKL #HarSaansMeinKabaddi #HSvJPP #HaryanaSteelers #JaipurPinkPanthers pic.twitter.com/BTLcxoeGqI
— ProKabaddi (@ProKabaddi) January 3, 2024
या सामन्यात सुरुवातीपासूनच जयपुर संघाने अफलातून चढाया केला तसेच सर्वोत्तम पकडीही केल्या. त्यांनी रेड गुणांतही बाजी मारली. एकूणच सामन्यात पहिल्या सत्रात त्यांनी हरियाणा संघाला फारशी संधी दिली नाही. जयपुरचा स्टार खेळाडू अर्जुन दशवाल १४ गुणांसह विजयाचा शिल्पकार ठरला.
रिझा मिरबेघरीने ७ गुण मिळवताना मोक्याच्या क्षणी त्याला सुरेख साथ दिली. त्यांच्या खेळाच्या जोरावर जयपुरने २१ रेड तर १७ टॅकल गुण मिळवले. हरियाणाच्या चंद्रन रंजीतने ११ गुणांची कमाई केली तसेच त्यांच्या मोहित योगालने ५ गुण मिळवताना अखेरच्या काही मिनिटांत चांगली लढत दिली मात्र, ते संघाचा पराभव टाळू शकले नाहीत.