भुवनेश्वर – अल्टीमेट खो-खोच्या सीझन दोन मध्ये बुधवारी झालेल्या सामन्यात तेलुगू योद्धासने मुंबई खिलाडीसला १८ गुणांनी पराभूत करत हा सामना जिंकला. हा सामना कटक येथील जवाहरलाल नेहरू इनडोअर स्टेडियमवर झाला. या सामन्यात मुंबईला अतिशय वाईट पध्दतीने पराभवाला सामोरे जावे लागले. या सामन्यामध्ये प्रतिक वाईकरला अष्टपैलू खेळाडूचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
Telugu Yoddhas activated their 𝔹𝕖𝕒𝕤𝕥 𝕄𝕠𝕕𝕖 in this game 🙌🏼#UltimateKhoKho #IndiaMaarChalaang pic.twitter.com/dH3viO0br2
— Ultimate Kho Kho (@ultimatekhokho) January 3, 2024
तेलुगू योद्धासने मुंबई खिलाडीसचा ४०-२२ (मध्यंतर २१-७) असा १८ गुणांनी धुव्वा उडवला. तेलुगू योद्धासने नाणेफेक जिंकून प्रथम आक्रमण घेतले व मुंबई खिलाडीसला संरक्षणासाठी आमंत्रित केले. सात मिनिटांच्या पहिल्या टर्नमध्ये मुंबई खिलाडीसच्या पहिल्या तुकडीतील प्रतिक देवारेला राहुल मंडलने सामन्याच्या सुरवातीलाच बाद केले. त्यानंतर एम. शिबिन सुध्दा दोन मिनिटाच्या आत मिलिंद चावरेकरने बाद केले तर ३.२० मिनिटापर्यंत हृषिकेश मुर्चावडेने संरक्षण करताना एक ड्रीम रणचा गुण सुध्दा मिळवला व त्याला प्रेम रणदिवेने बाद केले. त्यानंतर दुसरी तुकडी ५.२५ मिनीटापर्यंत टिकली त्यात पी. शिवा रेड्डी व गजानन शेंगाळ व एस श्रीजेश यांना बाद केले त्यात मिलिंद चावरेकरने दोन खेळाडू बाद केले तर गजाननला प्रतिक वाईकरने बाद केले. तर तिसऱ्या तुकडीतील सुभासिस संत्राला प्रसाद राडीयेने व सुनील पात्राला सौरभ आडवकरने बाद केले व तेलुगू योद्धासने १६ गुण मिळवले.
दुसऱ्या टर्न मध्ये मुंबई खिलाडीसने पॉवर प्लेने सुरवात केली ज्यात दोन वजीर घेऊन खेळत होते. तेलुगू योद्धासच्या अवधूत पाटीलला (१.०२ मि. संरक्षण) आकाशीय सूर मारत हृषिकेश मुर्चावडेने बाद केले. प्रतिक वाईकरला (१.२६ मि. संरक्षण) गजानन शेंगाळने बाद केले मात्र त्या आधी प्रतिकने एक ड्रीम रणचा गुण मिळवला होता. त्यानंतर आदित्य गणपुलेने (२.२७ मि. संरक्षण) ४ ड्रीम रन्सचे (एक तुकडी तीन मिनिटांपेक्षा जास्त वेळ संरक्षण केल्यावर १ ड्रीम रण मिळतो व त्यानंतर प्रत्येक ३० सेकंदानंतर १-१ ड्रीम रण मिळतो) गुण मिळवले व १४ गुणांची दमदार आघाडी घेतली.
Ultimate Kho Kho Season 2 : रोमांचक सामन्यात चेन्नई-ओडिशा बरोबरी…
मध्यंतरानंतर तिसऱ्या टर्न मध्ये मुंबई खिलाडीसची पहिली तुकडी जवळजवळ २.३३ मिनिटात बाद झाली. प्रतिक वाईकरने तेलुगू योद्धासच्या गुणांत भर घातली तर शेवटच्या खेळाडूने नाबाद राहत एक ड्रीम रणचा गुण सुध्दा मिळवला व मुंबईला ३७-०८ असे ३० गुणांचे आव्हन दिले. शेवटच्या व चौथ्या टर्न मध्ये तेलुगू योद्धासने ४०-२२ अशी आघाडी घेत १८ गुणांनी जिंकला. या सामन्यात मिलिंद चावरेकर उत्कृष्ट आक्रमक, आदित्य गणपुलेला उत्कृष्ट संरक्षक तर प्रतिक वाईकरला अष्टपैलू खेळाडूचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.