पूर्ण वेतनासाठी दररोज एक तास आंदोलन

पिंपरी -पिंपरीतील हिंदुस्थान ऍण्टिबायोटिक्‍स कंपनीतील कामगारांनी पूर्ण वेतन मिळावे, या मागणीसाठी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. कंपनीच्या प्रशासकीय इमारतीसमोर कामगार व अधिकारी रोज एक तास आंदोलन करत आहेत. गेल्या सहा दिवसांपासून हे आंदोलन सुरू आहे. सणा-सुदीला किमान पूर्ण वेतन द्यावे, अशी मागणी कामगार व अधिकारी करत आहेत. मात्र अद्याप कंपनी व्यवस्थापनाकडून कोणतेही ठोस आश्‍वासन देण्यात आलेले नाही.

“एचए’ कामगार व अधिकाऱ्यांचे 23 महिन्यांपेक्षा अधिक काळ वेतन रखडले आहे. कंपनी व्यवस्थापनाकडून केवळ 25 टक्‍के वेतन दिले जात आहे. ज्या कामगारांना तुलनेत अधिक वेतन आहे त्यांच्या कुटूंबाचा या वेतनातून उदरनिर्वाह होत आहे. कामगारांना कमी वेतन असल्याने त्यांच्या हातात कमी रक्‍कम येत आहे. त्यामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह करताना अडचणी येत आहेत.

सणासुदीच्या दिवशीही कामगारांना इतरांकडे हात पसरावे लागत आहेत. उधार व कर्ज काढून सण साजरे करावे लागत आहेत. कंपनीचे उत्पादन सुरू आहे. त्यामुळे कामगारांना पूर्ण वेतन द्यावे, अशी मागणी कामगारांकडून केली जात आहे. त्यासाठी 1 एप्रिलपासून कंपनी कार्यालयासमोर कामगार आंदोलन करत आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.