पिंपरी – राज्यातील सत्तांतरणानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या दोन्ही गटातील नेत्यांनी पिंपरी-चिंचवड शहरावर विशेष लक्ष केद्रिंत केले आहे. त्यामुळेच दोन्ही गटातील नेत्यांचे शहरात दौरे वाढले आहे. आज (शुक्रवार) उपमुख्यमंत्री अजित पवार शहर दौऱ्यावर येणार आहेत.
शहर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने आयोजित केलेल्या गणेशोत्सव आणि गौरी गणपती सजावट स्पर्धेचा उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात येणार आहे. आकुर्डी, प्राधिकरणातील ग. दि. माडगूळकर नाट्यगृहात सायंकाळी साडेचार वाजता हा कार्यक्रम होणार आहे. यावेळी महिला आयोग अध्यक्षा तथा राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर, यांच्यासह शहर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पदाधिकारी, गौरी-गणपती स्पर्धेतील विजेते उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे, महिला शहराध्यक्षा कविता आल्हाट यांनी प्रसारमाध्यमांना दिली.