World Cup 2023 Australia vs Pakistan Match Toss Update :- विश्वचषक 2023 स्पर्धेच्या 18 व्या सामन्यात ऑस्ट्रेलियासमोर पाकिस्तानचे आव्हान आहे. बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर दोन्ही संघ आमनेसामने येतील. सलग दुसऱ्या विजयाकडे ऑस्ट्रेलियाचे लक्ष लागले आहे. गेल्या सामन्यात त्यांनी श्रीलंकेचा पराभव केला होता. त्याचवेळी पाकिस्तानला भारताविरुद्ध पराभवाला सामोरे जावे लागले होते. त्यामुळे बाबर आझमचा संघ विजयी मार्गावर परतण्यास इच्छुक आहे.
पाकिस्तान विरूध्द ऑस्ट्रेलियाा हा सामना दुपारी दोन वाजता सुरू होईल. तत्पूर्वी झालेला नाणेफेकीचा (TOSS) कौल हा पाकिस्तानच्या बाजूनं लागला आहे. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाविरुद्ध गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. या सामन्यात उपकर्णधार शादाब खान खेळत नसल्याचे त्याने नाणेफेकीदरम्यान सांगितले. शादाबच्या जागी उसामा मीरला संधी देण्यात आली. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियाने एकही बदल केलेला नाही.
Pakistan have won the toss and elected to field first in Bengaluru’s #CWC23 debut 👊#AUSvPAK 📝: https://t.co/fpYkfrNVLd pic.twitter.com/Esks6ttIOc
— ICC (@ICC) October 20, 2023
एकदिवसीय क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यात एकूण 107 सामने झाले आहेत. यामध्ये ऑस्ट्रेलियानं 69 तर पाकने 34 सामन्यात विजय मिळविला आहे. तर 3 सामने अनिर्णत आणि एका सामना टाय झाला आहे.50 षटकांच्या विश्वचषक स्पर्धेत दोन्ही संघ 10 वेळा आमने-सामने आले आहेत. यामध्ये ऑस्ट्रेलियाने सहा सामने जिंकले आहेत आणि चार गमावले आहेत.