पिंपरी (प्रतिनिधी) – करोनाबाधितांची संख्या मंगळवारी (दि. 7) एकतीसवर पोहचली. शनिवारी (दि. 4) 27 बाधित रुग्ण आढळले होते. त्यानंतर रविवारी 18, सोमवारी 19 तर, मंगळवारी 31 बाधित रुग्ण आढळले आहेत.
दिवसभरात 8 रुग्ण करोनामुक्त झाले. करोनाच्या 128 रुग्णांवर गृहविलगीकरणात उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत एकूण 3 लाख 59 हजार 900 बाधित रुग्ण आढळले आहेत. तर, 3 लाख 55 हजार 879 रुग्ण बरे झाले आहेत. 4 हजार 624 रुग्णांचा मृत्यू झाला.