पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरामध्ये आज नवीन 132 करोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. तर 6 रुग्णांचा आज मृत्यू झाला. आजपर्यंत शहरामध्ये 93378 रुग्णांना करोनाची लागण झाली आहे.
पालिकेने प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार, आज चार वाजेपर्यंत शहरातील 123 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. तर शहराबाहेरील 9 रुग्णांना करोनाची लागण झाली. आज दिवसभरात 6 रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामध्ये शहरातील 4 व शहराबाहेरील 2 रुग्णांचा समावेश आहे.
आजपर्यंत 2348 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये शहरातील 1664 तर शहराबाहेरील 684 रुग्णांचा समावेश आहे. आज शहरातील चिखली, भोसरी, थेरगाव, पिंपरी येथील 4 रुग्णांचा मृत्यू झाला. तर शहराबाहेरील सोलापूर, नऱ्हे आंबेगाव येथील दोघांचा मृत्यू झाला.
आज दिवसभरात 64 रुग्णांना घरी सोडण्यात आले. त्यामुळे आजपर्यंत घरी सोडण्यात आलेल्या रुग्णांची संख्या 89657 इतकी झाली आहे. तर दिवसभरात 2636 संशयित रुग्णांना महापालिकेच्या रुग्णालयामध्ये दाखल केले आहे.