पिंपरी: भाजप हेकेखोरांची हकालपट्टी करणार

पिंपरी-चिंचवड भाजपाकडून घरभेद्यांना सज्जड इशारा
पिंपरी –
गेल्या काही दिवसांपासून भाजपमध्ये पक्षविरोधी भूमिका घेणाऱ्यांची संख्या वाढतच चालली आहे. परंतु आता पक्षाने अशा पदाधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे निश्‍चित केले असून हेकेखोर आणि घरभेद्यांची हाकलपट्टी करणार असल्याचा इशारा दिला आहे.

भाजप हा शिस्तप्रिय पक्ष आहे. पक्षविरोधी कारवायांना थारा दिला जाणार नाही. पदांचा लाभ मिळविण्यासाठी पक्षाची बदनामी सहन केली जणार नाही. प्रसंगी हेकेखोरांची हकालपट्टी करण्यात येईल, असा थेट सज्जड इशारा भाजपाने आपल्या पक्षातील घरभेद्यांना दिला आहे. त्यामुळे प्रसिद्धीसाठी नौटंकी करणाऱ्यांवर हाकलपट्टीची कारवाई होण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे.

पिंपरी-चिंचवड शहर भाजपाच्या वतीने मंगळवारी (दि. 19) प्रसिद्ध केलेल्या पत्रकामध्ये म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी भाजपामधील काही नगरसेवकांनी गेल्या काही दिवसांपासून पक्षाविरोधात वक्तव्य करण्यास सुरूवात केली आहे. वास्तविक, पक्षाने सर्वांना समान न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, महत्त्वाच्या पदांसाठी काहीजण अडवणूक करुन पक्षाची बदनामी करण्याचा प्रयत्न करीत आहेत.

निराधार वक्तव्य करणाऱ्यांची पर्वा राज्यातील पक्षश्रेष्ठी करणार नाहीत. काहीही झाले, तरी भाजपाची एकहाती सत्ता महापालिकेत पुन्हा येणार आहे. पक्ष म्हणून सर्वांनी एकोप्याने काम करणे अपेक्षित आहे. पण, कोणी पक्षाला आणि नेत्यांना आव्हान देऊन वेठीस धरण्याचा प्रयत्न करीत असेल, तर त्यांची गय केली जाणार नाही.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.