पिंपरी -पिंपरी चिंचवड महापलिकेच्या आकुर्डी रूग्णालयातातील वैद्यकीय अधिकारी डॉ. उज्वला पगारे या उपचारासाठी दाखल झालेल्या रूग्णांना रक्त तपासणीसाठी पालिकेच्या प्रयोगशाळेत (लॅब) न पाठविता खासगी ठिकाणी पाठवित होत्या.
त्या संदर्भात रूग्णांनी तक्रारी केल्यानंतर आयुक्त राजेश पाटील यांनी त्यांच्यावर कारवाई करीत त्यांना 500 रूपये दंड केला आहे.डॉ. पगारे यांच्याकडे करोना रूग्णांना दाखल करून घेणे, त्यांचे समुपदेश करणे, होम आयसोलेट विषय मार्गदर्शन करणे आदी कामकाज आहे. आकुर्डी रूग्णालयात दाखल रूग्णांना रक्ताच्या तपासणीसाठी बाहेरील लॅबकडे पाठवित होत्या.
त्या संदर्भात रूग्णांनी तोंडी तक्रार केल्या. त्यांची दखल घेऊन प्रशासनाने त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती. त्यांनी कर्तव्यात कसूर केले असून, गैरवर्तन करून वैद्यकीय संहितेचा भंग केला आहे. त्यामुळे त्यांना 500 रूपये दंड करण्यात आला आहे. या पुढे असा शिस्तभंग केल्यास अधिक दंड करण्याचा इशारा आयुक्तांनी दिला आहे.