मुंबई – राज्यभर गाजलेल्या बेकायदेशीर फोन टॅपिंग प्रकरणात नवाब मलिकांचा जबाब नोंदवण्याची मुंबई पोलिसांना परवानगी मिळाली आहे. फोन टॅपिंग प्रकरणात तपास करण्याकरिता नवाब मलिक यांची चौकशीची परवानगी मिळण्याकरिता मुंबई पोलिसांनी कोर्टात विनंती अर्ज केला होता.
आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांनी बेकायदेशीररित्या फोन टॅपिंग करत गोपनीय अहवाल लीक केल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केला होता.
न्यायालयाने याला परवानगी दिल्यानंतर आता मुंबई पोलिसांची सायबर सेल शाखा या प्रकरणी नवाब मलिकांचा जबाब नोंदवणार आहे. नवाब मलिक यांना ईडीने मनी लॉंड्रिंग गैरव्यवहार प्रकरणात फेब्रुवारी महिन्यात अटक केली होती. नवाब मलिक सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत.