Nawab Malik Health । माजी मंत्री नवाब मलिक यांच्याविषयी महत्वाची बातमी समोर येत आहे. मलिक यांची अचानक प्रकृती बिघडल्याचे सांगण्यात येत आहे. मलिक यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना कुर्ल्यातील क्रिटिकेअर सेंटर रुग्णालयात तातडीने दाखल करण्यात आलंय. नवाब मलिक यांना नेमकं काय झालं ज्यामुळे त्यांना एवढ्या तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. हे अद्याप समजू शकलेले नाही. मात्र सध्या त्यांच्यावर उपचार चालू असल्याचे म्हटले जात आहे.
नवाब मलिक यांच्यावर उपचार सुरु Nawab Malik Health ।
नवाब मलिक हे राष्ट्रवादी काँग्रेसचे मोठे नेते आहेत. महाविकास आघाडी सरकारमध्ये ते मंत्री राहिलेले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बंड केल्यानंतर त्यांनी अजित पवार यांना समर्थन देण्याचा निर्णय घेतला. काही महिन्यांपूर्वी ते तुरुंगातून बाहेर आहेत. तेव्हापासून ते सार्वजनिक कार्यक्रमात फारसे दिसलेले नाहीत. त्यानंतर आता त्यांची प्रकृती ठिक नसल्याचे समोर आले आहे. सध्या त्यांच्यावर उपचार चालू आहेत.
प्रकृतीचे कारण देत मागितला होता जामीन Nawab Malik Health ।
नवाब मलिक यांना ईडीने 2022 मध्ये गोवावाला कंपाऊंड प्रकरणात मनी लाँड्रिंग कायद्याखाली अटक केली होती. तेव्हापासून ते तुरुंगात होते. नंतर ऑगस्ट 2023 मध्ये ते अटीशर्तीसह जामिनावर तुरुंगातून बाहेर आले होते. प्रकृतीचे कारण देत जामीन मिळावा अशी मागणी तेव्हा त्यांनी केली होती.
अगोदर तटस्थ नंतर अजित पवार गटात दाखल
नवाब मलिक तुरुंगातून बाहेर आले तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस दोन गटांत विभागलेली होती. त्यामुळे ते कोणत्या गटात सामील होणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. सुरुवातीला त्यांनी तटस्थ भूमिक घेतली होती. नंतर मात्र त्यांनी अजित पवार गटाला साथ देण्याचा निर्णय घेतला. सध्या ते अजित पवार गटात आहेत.