नवी दिल्ली – पेट्रोल, डिझेल दरवाढीचे सत्र सलग चौथ्या दिवशी कायम राहिले. त्या इंधनांच्या किमती बुधवारी अनुक्रमे 40 आणि 45 पैशांनी वाढल्या. त्यामुळे अवघ्या चार दिवसांत लिटरमागे पेट्रोल 2 रूपये 14 पैशांनी तर डिझेल 2 रूपये 23 पैशांनी महागले आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत दररोज बदल करण्याच्या प्रक्रियेत 82 दिवस खंड पडला होता.
ती प्रक्रिया सार्वजनिक इंधन कंपन्यांनी रविवारपासून पुन्हा सुरू केली. तेव्हापासून पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढत आहेत. पहिले दोन दिवस दोन्ही इंधने प्रत्येकी 60 पैशांनी महागली. त्यानंतर मंगळवारी पेट्रोलच्या दरात 54 पैशांची तर डिझेलच्या दरात 58 पैशांची वाढ करण्यात आली.