मुंबई – देशासह महाराष्ट्रात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. साडेचार महिने तेलाच्या किंमती स्थिर ठेवल्यामुळे जो तोटा सहन करावा लागला, त्याची किंमत तेल कंपन्या आता दररोज दर वाढवून सर्वसामान्यांकडून वसूल करत आहेत. अलीकडची गोष्ट
म्हणजे पेट्रोल आणि डिझेलच्या किमती १५ दिवसांत तब्बल १३ वेळा वाढल्या असून, सामान्य जनतेच्या खिशाला मोठी कात्री बसत आहे. चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातील महत्वाच्या शहरांमध्ये पेट्रोल- डिझेलच्या वाढत्या किमतीमुळे किती भडका निर्माण झाला आहे ते…
महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील पेट्रोल-डिझेलचे दर
अहमदनगर – पेट्रोल १२०.९८ रुपये / डिझेल १०३.६५ रुपये
मुंबई शहर – पेट्रोल १२०.५१ रुपये / डिझेल १०४.७७ रुपये
पुणे – पेट्रोल १२०.७४ रुपये / डिझेल १०३.४१ रुपये
सातारा – पेट्रोल १२०.७४ रुपये / डिझेल १०३.४१ रुपये
अकोला – पेट्रोल १२०.१९ रुपये / डिझेल १०२.९२ रुपये
चंद्रपूर – पेट्रोल १२१.०५ रुपये / डिझेल १०२.९९ रुपये
परभणी – पेट्रोल १२३.५३ रुपये / डिझेल १०६.१० रुपये
सोलापूर – पेट्रोल १२०.१८ रुपये / डिझेल १०२.९० रुपये
ठाणे – पेट्रोल १२०.५८ रुपये / डिझेल १०४.८३ रुपये