Petrol Diesel Rates – दिवाळीनंतर पेट्रोल -डिझेल स्वस्त होण्याची शक्यता आहे. कारण कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण काही काळापासून दिसून येत आहे. गेल्या 4 महिन्यांतील नीचांकी पातळी कच्च्या तेलाच्या किमतीने गाठली आहे.
13 नोव्हेंबर रोजी क्रूडची किंमत प्रति बॅरल 80 डॉलरवर पोहोचली होती, त्यापूर्वी 13 जुलै रोजी ही किंमत प्रति बॅरल 82 डॉलर होती. तर, 27 ऑक्टोबर रोजी ते प्रति बॅरल 96 डॉलर होते. दरम्यान, गेल्या दोन आठवड्यात कच्च्या तेलाच्या किमती सुमारे 17 टक्क्यांनी घसरल्या आहेत.
कच्च्या तेलाच्या किमतीत घसरण ही भारतासाठी चांगली बातमी आहे. भारत आपल्या गरजेच्या 75 टक्के कच्च्या तेलाची आयात करतो. आता कच्च्या तेलाच्या किमती कमी होत असल्याने देशातील पेट्रोल आणि डिझेलच्या किमती काही प्रमाणात नक्कीच कमी होतील अशी अशा व्यक्त केली जात आहे.
असेही मानले जात आहे की, पुढच्या वर्षी सार्वत्रिक निवडणुका आहेत आणि पेट्रोल-डिझेलच्या किमती कमी करून सरकार सर्वसामान्यांना एक भेट देऊ शकते. दरम्यान, कच्चे तेल 1 डॉलरने महाग झाल्यास पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 50 ते 60 पैशांनी वाढ होण्याची शक्यता आहे. कच्च्या तेलाच्या किमतीत घट झाल्यास भारतातही हीच घसरण दिसून येते.