Jitendra Awhad : मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी (Amit Shah) राज्यात भाजपा सरकार आल्यास मोफत रामलल्ला (Ram Temple) दर्शनाचे आश्वासन दिले होते. त्यांनी दिलेल्या या आश्वासनावर आता चौफेर टीका होत आहे.
अश्यातच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad ) यांनी अमित शहांच्या या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला आहे.
आव्हाड म्हणाले की, या असल्या बातम्या पाहिल्या की माझा विश्वास अजूनच दृढ होतो, भाजपासाठी प्रभू श्री राम हे फक्त पॉलिटिकल टूल आहेत बाकी काही नाही. श्रीरामाला यांनी फक्त त्यांच्या राजकारणासाठी वापरलंय.
शाह यांचं हे विधान देशभरातील, जगभरातील तमाम हिंदूंचा अपमान करणारं आहे. संपूर्ण जगात हिंदू बांधव पसरलेत. फक्त निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन, मध्य प्रदेशच्या जनतेला मोफत दर्शन घडविण्याचे आमिष दाखवलं जातंय.
वास्तविक पाहता, श्रद्धा हा लोकांच्या आस्थेचा विषय आहे. त्याचा असा बाजार मांडणं हे जगभरातील रामभक्तांच्या श्रद्धेशी, भावनांशी खेळण्याचा प्रकार आहे. असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.