हिंसाचाराला बाहेरील लोक जबाबदार – तृणमूल

नवी दिल्ली  –अमित शहा यांनी त्यांच्या रोड शोसाठी कोलकात्यात बाहेरून लोक आणले होते. ते लोकच हिंसाचाराला जबाबदार असल्याचा आरोप पश्‍चिम बंगालमधील सत्तारूढ तृणमूल कॉंग्रेसने केला. बंगालबाहेरील भाजपच्या गुंडांनी महाविद्यालयातील दिग्गज तत्वज्ञ ईश्‍वरचंद्र विद्यासागर यांच्या पुतळ्याची मोडतोड केली.

त्यांना बंगालचा समृद्ध इतिहास आणि संस्कृती यांची माहिती आहे का? बंगाल त्यांना कधीच माफ करणार नाही, अशी प्रतिक्रिया तृणमूलचे प्रवक्‍ते डेरेक ओब्रायन यांनी दिली. तर भाजपने विद्यासागर यांना वाहिलेली हीच आदरांजली आहे का, असा सवाल तृणमूलच्या आणखी एका नेत्याने केला. त्यामुळे रोड शोमधील राड्यावरून भाजप आणि तृणमूलमध्ये झडणाऱ्या आरोप-प्रत्यारोपांच्या फैरींवरून राजकारण आणखीच तापण्याची चिन्हे आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.