पिंपरी : शालेय साहित्याला सर्वसाधारण सभेच्या अंतिम मान्यतेची प्रतीक्षा

अद्याप मंजुरी नसल्याने खरेदीला खर्च करणे अशक्‍य

पिंपरी – महापालिकेच्या 2019-20 या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पात शालेय साहित्य खरेदीसह अन्य कामांसाठी आवश्‍यक खर्च करण्यासाठी सर्वसाधारण सभेच्या अंतिम मान्यतेची प्रतीक्षा आहे. ही मंजुरी जून महिन्यात होणाऱ्या विशेष सर्वसाधारण सभेत अपेक्षित आहे. त्यानंतरच प्राथमिक शिक्षण विभागाला खर्च करता येणार आहे.

लोकसभा निवडणुकीची आचारसंहितेमुळे गेल्या दोन महिन्यांमध्ये शालेय साहित्य किंवा अन्य खरेदीसाठी आवश्‍यक खर्च करता आला नाही. 2019-20 हे नवीन आर्थिक वर्ष एप्रिल महिन्यापासून सुरू झाले. संबंधित वर्षातील प्राथमिक शिक्षण विभागासाठी केलेल्या 142 कोटी 6 लाख रुपये खर्चाच्या तरतुदीला स्थायी समिती सभेने मंजुरी दिली आहे. मात्र, सर्वसाधारण सभेची अंतिम मंजुरी बाकी आहे.

बालवाड्यांसाठी पाच कोटींची तरतूद

महापालिकेच्या बालवाड्यांतील विद्यार्थ्यांसाठी गणवेश, खेळणी, स्वेटर, दफ्तरे आणि पावसाळी साधने यांच्यासह अन्य खर्चासाठी 4 कोटी 96 लाख रुपयांची तरतूद ठेवण्यात आली आहे. ही तरतूद खर्च करण्यासाठी देखील सर्वसाधारण सभेची मंजुरी लागणार आहे.

“प्राथमिक शिक्षण विभागासाठी 2019-20 या आर्थिक वर्षात महापालिका अर्थसंकल्पात केलेल्या तरतुदींना स्थायी समिती सभेने मंजुरी दिलेली आहे. सर्वसाधारण सभेची अंतिम मंजुरी मात्र बाकी आहे. पर्यायाने, नवीन आर्थिक वर्षात शालेय साहित्य किंवा अन्य खरेदीसाठी आवश्‍यक खर्च करणे शक्‍य झालेले नाही. ही मंजुरी मिळाल्यानंतर खर्च करता येईल.
– ज्योत्स्ना शिंदे, प्रशासन अधिकारी, प्राथमिक शिक्षण विभाग

अर्थसंकल्पातील प्रमुख तरतुदी (2019-20)

विद्यार्थी गणवेश 9 कोटी 05 लाख, पी.टी.गणवेश 6.46, कोटी, खेळ शाळा गणवेश 3 कोटी, स्काऊट गाईड गणवेश 5 लाख, स्वेटर खरेदी 2 कोटी 99 लाख, विद्यार्थी शूज व सॉक्‍स 1 कोटी 5 लाख, पी.टी.शूज 1 कोटी 05 लाख, दफ्तरे व पाट्या 95 लाख, पावसाळी साधने 1 कोटी 60 लाख, शालेय साहित्य 75 लाख, सीसीटिव्ही कॅमेरे 2 कोटी, सर्वांगीण शैक्षणिक गुणवत्ता व विकास 20 लाख, विद्यार्थी आरोग्य 1 लाख 15 हजार, ई-लर्निंग स्कूल 1 कोटी 50 लाख रुपये.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.