मुंबई- बॉलिवूड अभिनेत्री ‘पायल रोहतगी’ गेल्या काही दिवसांपासून आपल्या वादग्रस्त विधानामुळे जोरदार चर्चेत आहे. पायलने काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर ‘राजा राममोहन रॉय’ यांच्यावर गंभीर आरोप केला होता. मात्र, पायलने पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केलं आहे. यावेळी तिने थेट महाराष्ट्राचे आराध्य दैवत ‘छत्रपती शिवाजी महाराज’ यांच्याविषयी वादग्रस्त पोस्ट शेअर केली आहे.
पायलने आपल्या ट्विटर अकाउंटवरून “छ. शिवाजी महाराज क्षत्रिय कुळाचे नसून त्यांचा जन्म शूद्र जातीत झाल्याचं” म्हंटल आहे. त्यामुळे या वादग्रस्त वक्तव्यानंतर तिच्यावर सर्व स्तरांमधून टीकेची झोड उठत आहे. तिच्या पोस्टमुळे अनेकांनी संताप व्यक्त केला आहे.