BJP Candidate list । आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने आपली पहिल्या उमेदवारांची यादी जाहीर केली. त्यासाठी भाजपाचे सरचिटणीस विनोद तावडे यांनी जाहीर केलेल्या यादीत एकूण ३४ मंत्र्यांना स्थान देण्यात आलंय. भाजपाने पहिल्या यादीत २८ महिला उमेदवारांची नावंदेखील जाहीर केलीत. दरम्यान, या यादीत भाजपने दिग्गजांना पूर्णपणे डावललं असल्याचे दिसतंय. तर बॉलिवूडसह भोजपुरी, दाक्षिणात्य आणि बंगाली कलाकारांना लोकसभेची उमेदवारी दिली आहे.
अशात भोजपुरी स्टार पवन सिंगने आसनसोलमधून निवडणूक लढवण्यास नकार दिला आहे. भाजपने पश्चिम बंगालमधील आसनसोल येथून पवन सिंह यांना उमेदवारी दिली होती जिथून टीएमसी नेते शत्रुघ्न सिन्हा सध्या खासदार आहेत.
नेमकं काय म्हणाले पवन सिंह
‘मी भारतीय जनता पक्षाच्या सर्वोच्च नेतृत्वाचे मनापासून आभार व्यक्त करतो. पक्षाने माझ्यावर विश्वास ठेवला आणि मला आसनसोलमधून उमेदवार म्हणून घोषित केले पण काही कारणास्तव मी आसनसोलमधून निवडणूक लढवू शकणार नाही…’ पवन सिंह यांची ही पोस्ट पुन्हा पोस्ट करत, टीएमसीचे सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी यांनी त्यांची खरडपट्टी काढली आहे. अभिषेक बॅनर्जी यांनी लिहिले, ‘पश्चिम बंगालच्या लोकांची अदम्य भावना आणि शक्ती.’
हेही वाचा
Amravati MP Navneet Rana । खासदार नवनीत राणा भाजपात प्रवेश करणार?