फ्लोरिडा – करोनाची लागण झालेल्या मधुमेह रूग्णांना आरोग्य विषयक गंभीर धोका निर्माण होऊ शकतो आणि त्यांना हदयरोगाचा मोठा धोका उद्भवू शकतो असा निष्कर्ष वैद्यकीय तज्ज्ञ डॉ. दिनेंदर सिंगला यांनी संशोधनातून काढला आहे. त्यांचा हा संशोधन अहवाल अमेरिकेतील एका वैद्यकीय जर्नल मध्ये प्रकाशित झाला आहे. त्यात त्यांनी ही बाब नमूद केली आहे.
त्यांनी म्हटले आहे की करोनामुळे मधुमेहींच्या जनेटिक स्थितीत जे बदल झाले आहेत त्यातून त्यांना जे विकार संभवतात त्यातून हदय आणि मेंदुला हानी पोहचू शकते. कोविड 19 मुळे मनुष्याच्या जनेटिक स्थितीत मोठे फेरबदल होतात असे दिसून आल्याचे त्यांनी नमूद केले आहे. त्यातून त्यांचा मधुमेह आणखी बळावण्याची व अन्यही गंभीर आजार होण्याची शक्यता वाढते असे त्यांचे म्हणणे आहे.
कोविड 19 मुळे मधुमेही रूग्णांच्या आरोग्याची गुंतागुंत अधिक वाढण्याचा धोका आहे तसेच त्यांना अल्झायमर सारख्या दुर्धर आजाराचीही लागण होण्याचा धोका आहे. कोविड 19 मुळे मधुमेही रूग्णांच्या रक्ताचे सेल्युलर कॉम्पोझिशन बिघडण्याचा धोका अधिक आहे. ज्यांना मधुमेह आहे पण ज्यांना कोविड 19 झालेला नाही अशा रूग्णांना हा धोका कमी असतो.
Election Commission of India : निवडणूक आयुक्तपदी अरूण गोयल यांची नियुक्ती
कोविडची लागण झालेल्या मधुमेही रूग्णांमध्ये सेल्युलर कॉम्पोझिशनचे बदल झाले आहेत त्याचा अधिक व्यापक अभ्यास करण्याची गरज आहे, त्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत असेही त्यांनी म्हटले आहे.