दोडा जिल्ह्यात प्रवासी बस दरीत कोसळली; 12 ठार

जम्मू- जम्मू काश्‍मीरमधील दोडा जिल्ह्यामध्ये प्रवासी वाहन दरीमध्ये कोसळून झालेल्या अपघातामध्ये 12 जण ठार झाले आणि अन्य चौघेजण जखमी झाले. दोडा जिल्ह्यातील मारमत या डोंगराळ प्रदेशात हा अपघात घडला, असे वरिष्ठ पोलिस अधिक्षक मुमताझ अहमद यांनी वृत्तसंस्थेला सांगितले.

मृतांमध्ये दोन लहान मुलांचाही समावेश आहे. अपघातातील ज्खमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

हे प्रवासी वाहन मरमत येथून क्‍लीनी गावाच्या दिशेने चालले होते. त्यावेळी एका वळणावर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्यामुळे वाहन खोल दरीत कोसळले. अपघाताच्या ठिकाणी जखमींना सोडवण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.