एसटी कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस

नगर  – प्रलंबित मागण्यांसाठी निदर्शने केल्याने परिवहन महामंडळाने कामगारांना कारणे दाखवा नोटीस बजावली असून, त्यावर खुलासा देण्याच्या सूचना दिल्या गेल्या आहेत. आंदोलनातील सहभागामुळे दिवाळी भेट आणि एक दिवसाचा पगार का कपात करू नये, असे महामंडळाने नोटिशीत म्हटले आहे. या नोटिशीत कामगारांना खुलासा सादर करावा लागणार आहे.

कामगारांना दिवाळीनिमित्त तीन टक्के महागाईभत्ता थकबाकीसह देण्यात यावा; तसेच दिवाळीपूर्वी ऑक्‍टोबर महिन्याचे वेतन द्यावे, सरकारी निर्णयानुसार थकबाकीसह महागाईभत्ता, कामगारांना अग्रीम रक्कम, ऑक्‍टोबर महिन्याचा पगार दिवाळीपूर्वी मिळणे आवश्‍यक होता. या मागण्यांसाठी मान्यताप्राप्त कामगार संघटनेच्या नेतृत्वाखाली राज्यातील विभागीय कार्यालयांसमोर निदर्शने करण्यात आली.

त्याची दखल घेत महामंडळाने या नोटिसा बजावल्या आहेत. महामंडळाने दिवाळीपूर्वी रक्कम दिल्यानंतरही निदर्शने करण्यात आली. त्यामुळे दिवाळी भेट आणि एक दिवसाचे वेतन का कपात करू नये, याबाबत खुलासा करावा, असे महामंडळाने स्पष्ट केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.