पिंपरीत भाजप कार्यालयासमोर कार्यकर्त्यांचा विजयी जल्लोष

पिंपरी  – मावळ लोकसभेचे उमेदवार श्रीरंग बारणे यांचा विजय तसेच केंद्रात पुन्हा एकदा मोदी सरकार येणार हे स्पष्ट झाल्यानंतर भाजप कार्यालयासमोर कार्यकर्त्यांनी विजयी जल्लोष साजरा केला. पिंपरी-चिंचवड भाजपचे शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांना भाजप पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी पेढे भरवून आनंदोत्सव साजरा केला. दरम्यान, मावळ लोकसभा निवडणुकीत महायुतीला आणि देशात भारतीय जनता पक्षाने घवघवीत यश मिळवल्याने कार्यकर्त्यांनी नरेंद्र मोदी यांचा जयघोष केला.

पक्ष कार्यालयात साखर-पेढे वाटले. फटाक्‍यांची जोरदार आतषबाजी करण्यात आली. पिंपरी चिंचवड भाजपचे शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप, पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष सदाशिव खाडे, महापालिकेचे सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, स्थायी समितीचे सभापती विलास मडिगेरी, “ब’ प्रभाग अध्यक्षा करुणा चिंचवडे, नगरसेवक शितल शिंदे, नामदेव ढाके, कैलास (बाबा) बारणे, चंद्रकांत नखाते, बाबू नायर, नगरसेविका शर्मिला बाबर, कमल घोलप, संघटन सरचिटणीस प्रमोद निसळ, सरचिटणीस अमोल थोरात, भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य अमित गोरखे, स्वीकृत नगरसदस्य विनोद तापकीर, राजेश पिल्ले, रामकृष्ण राणे, राजू दुर्गे, शेखर चिंचवडे, पोपट हजारे व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here