पहिल्या फेरीपासून डॉ. कोल्हे यांना आघाडी

पुणे – शिरूर लोकसभा मतदारसंघात 12 लाख 92 हजार मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. 2014 च्या लोकसभेच्या तुलनेत यावर्षी 2 लाख 2 हजारांनी मतदान वाढले होते. गुरुवारी सकाळी बालेवाडी येथील क्रीडा संकुल येथे मतमोजणीस प्रारंभ झाला. पहिल्या फेरीत शिवसेनेचे आढळराव पाटील यांना 16 हजार 39 मते तर राष्ट्रवादीचे डॉ.कोल्हे यांना 22 हजार 258 मते मिळाली.

पहिल्या फेरीत डॉ. कोल्हे यांनी 6 हजार 219 मतांची आघाडी मिळाली. पहिल्या फेरीपासून डॉ. कोल्हे यांना मिळालेली मतांची आघाडी शेवटच्या फेरीपर्यंत कायम राहिली. 25 व्या फेरीपर्यंत कोल्हे यांनी 57 हजार 57 मतांची आघाडी घेतली. तर 27 व्या फेरीमध्ये कोल्हे यांना 6 लाख 9 हजार 11 मते तर आढळराव पाटील यांना 5 लाख 49 हजार 33 मते मिळाली.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here