महापौर मोहोळ यांचे प्रतिपादन
औंध – समाजात काम करून पक्षाची ताकद वाढवणारा कार्यकर्ता प्रत्येक पक्षाला हवा असतो. लहू बालवडकर म्हणजे पक्षाची ताकद वाढवणारा कार्यकर्ता आहे, आगामी काळात पक्ष त्यांना निश्चित मोठी संधी देईल, यासाठी आम्ही प्रयत्न करू, असे आश्वासन महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिले.
बाणेर-बालेवाडी येथील निराधार व विकलांग नागरिकांसाठी “लहू बालवडकर सोशल वेलफेअर’ तर्फे घरपोच अन्नसेवा नित्य पुण्यपर्ण व प्रभागातील नागरिकांसाठी मोफत रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा पार पडला. यावेळी महापौर मोहोळ बोलत होते.
यावेळी सभागृह नेते पदी निवड झाल्याबद्दल गणेश बिडकर यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी पालिकेचे सभागृह नेते गणेश बिडकर, युवा मोर्चा अध्यक्ष राघवेंद्र मानकर, प्रकाश बालवडकर, राहुल कोकाटे, उद्योजक गणेश गायकवाड, तुकाराम सुर्वे, गणेश जगताप, सचिन दळवी उपस्थित होते.
महापौर मोहोळ यांनी सांगितले की, निराधार लोकांसाठी अन्न व रुग्णवाहिका, असे सामजिक विधायक उपक्रम राबविले जात आहेत. करोना काळात देखील बालवडकर यांनी स्तुत्य उपक्रम राबविले. सभागृह नेते गणेश बिडकर यांनीही बालवडकर यांच्या सामाजिक कार्याचे कौतूक केले.
लहू बालवडकर म्हणाले की, केवळ मित्रांच्या आग्रहाने सोशल वेलफेअरच्या माध्यमातून हा कार्यक्रम राबवण्यात आला आहे. अशीच विविध समाज उपयोगी कामे येथून पुढेही करण्यात येणार आहे. या उपक्रमासाठी मित्रांची साथ खूप महत्त्वाची आहे.