कुरकुंभमधील हार्मोनी कंपनीची सामाजिक ‘दरवळ’

आयआयटी कानपूरमध्ये केमिकल इंजिनिअरिंगची पदवी घेऊन उद्योगक्षेत्रात उंच भरारी घेणाऱ्या एका 72 वयाच्या तरुण यशस्वी उद्योजकाची प्रेरणादायी प्रवासाला अधोरेखित करणारी व शेकडो कुटुंबांना आर्थिक आधार देऊन सर्वसामान्यांना न्याय देणारी, तसेच सामाजिक क्षेत्रात अग्रेसर राहून समाजाप्रती आपला निष्ठता सिद्ध करणाऱ्या “हार्मोनी’ कंपनीच्या कार्याचा घेतलेला आढावा.

कुरकुंभ औद्योगिक क्षेत्रात हार्मोनी ओर्गनिक्‍स या नावाने सुरू केलेले रोपटं आज वटवृक्षाच्या रूपात समोर येत आहे. एका समृद्ध आणि उच्च शिक्षित कुटुंबातील रवी नांगिया यांचा ध्येयवादी प्रवास
“हार्मोनी’च्या रूपात साकारला आहे. रासायनिक क्षेत्रात आपल्या कौशल्याने व स्वकर्तृत्वावर भरारी घेऊन जागतिक स्तरावर सुगंधी द्रव्याच्या व्यवसायात आपला ठसा उमटवला आहे. आज कुरकुंभ येथील रासायनिक प्रकल्पात स्थानिकांना रोजगार उपलब्ध करून देताना आणि रोटरी क्‍लबच्या अध्यक्षीय कालावधीच्या माध्यमातून सर्वसामान्य कामगारांना मोफत औषधाच्या सोयी उपलब्ध करून देण्यात रवी नांगिया यांनी भरीव योगदान दिले आहे.

कुरकुंभमधील दुष्काळाच्या संकट समयी ग्रामीण भागात टॅंकरच्या सहाय्याने पाणीपुरवठा, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना शालेय साहित्याच्या माध्यमातून शिक्षणास मदत करणे त्याचबरोबर कुठल्याही सामाजिक कार्यात लागणारा सहभाग असो यामध्ये नेहमीच अग्रभागी राहून हार्मोनी कंपनीने आपले सामाजिक कर्तव्य पार पाडले आहे. यामध्ये व्यवस्थापक दीपक चौधरी यांनी देखील आपल्या कर्तव्याची चुणूक दाखवत या कार्यास आपल्या कौशल्याने पूर्ण केल्याचे आजवर दिसून आले आहे. कुरकुंभ औद्योगिक क्षेत्रात राबवण्यात येणाऱ्या प्रत्येक उपक्रमातील सहभागाने “हार्मोनी’ला नेहमीच केंद्रस्थानी ठेवले आहे.

दीपक चौधरी यांनी व्यवस्थापनाची जबाबदारी सांभाळली आहे तर दुसरीकडे उत्पादनात उद्योगाला इतर सर्व स्पर्धकांच्या पुढे ठेवण्याचे काम निलेश ठाकूर यांनी लीलया पेलली आहे. तांत्रिकदृष्ट्या मोलाचे योगदान देताना निर्माण होणाऱ्या रासायनिक सांडपाणी अथवा कचऱ्याचे योग्य नियोजन करून पर्यावरणाचा समतोल राखण्याचे अतिशय महत्वपूर्ण काम करीत आहेत. दरम्यान, दीपक चौधरी एका साप्ताहिकाचे व्यवस्थापक असून, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ दौंडचे सदस्य असून ते सामाजिक कार्यातही ते आग्रभागी असतात.

“हार्मोनी’च्या सर्वच सदस्यांनी आजवर केलेल्या कार्याची दखल विविध सामाजिक संस्थांनी घेऊन त्यांना विविध पुरस्कारांनी सन्मानित केले आहे. यापुढेही या सर्वांची उद्योग क्षेत्रातील व सामाजिक जबाबदारीची घौडदौड ही अशीच सुरू ठेवण्याचे अविरत काम कंपनीचे व्यवस्थापन पेलणार असल्याची ग्वाही यावेळी व्यक्‍त केली जात आहे.

दीपक चौधरी यांचे समाजभान
जीवनाशी संघर्ष करीत अनेक संकटांचा जो धाडसाने सामना करतो तो आयुष्यात यश शिखर गाठतो. अशा परिस्थितीशी झुंज देत दीपक मोतीराम चौधरी यांनी जीवनाचा अतिशय खडतर प्रवास करून यशाला गवसणी घालत सध्या ते कुरकुंभ औद्योगिक नगरीमधील 

हार्मोनी ऑरगॅनिक्‍स लि. कंपनीमध्ये ऍडमिन मॅनेजर या पदावर कार्यरत आहेत. वाटेल ती मदत करण्याची आवड असल्याने त्यांनी कुरकुंभ येथे देखील समाजसेवा करण्यास सुरुवात केली. कामगारांच्या अडचणी दूर करण्यास सुरुवात केली. श्री फिरंगाईमाता विद्यालय, कुरकुंभ या शाळेतील पाच विद्यार्थी दत्तक घेऊन शिक्षणाचा खर्च करण्याची तयारी दाखविली व त्यांना वह्या, पुस्तके, बॅग, कपडे असे देऊ केले. जेव्हा कुरकुंभ परिसरातील मुकादमवाडीत पाण्याची समस्या जाणवत होती तेव्हा त्यांनी वडिलांच्या स्मरणार्थ टॅंकरने पाणी पुरविले होते.

करोना काळातही दिला मदतीचा हात
करोनाचे संकट आपल्या देशात आले असता महाराष्ट्रात करोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने झालेल्या लॉकडाऊनमुळे सर्व व्यवहार ठप्प झाले होते. अनेक नागरिक बेरोजगार झाले होत. अनेकांची कामे बंद झाली, त्यामुळे अनेकांवर आर्थिक संकट ओढवले होते. त्यामुळे लोकांचे होणारे हाल अन्‌ दोनवेळचे पोटही लोक भरू शकत नव्हते हे त्यांना पाहवले नाही अन्‌ त्यांनी थेट दुकान गाठत किराणामाल खरेदी केला व तो लोकांना धान्य वाटप केले. त्यांच्या परीने जेवढी मदत करता येईल तेवढी त्यांनी केली.

त्याचप्रमाणे डॉक्‍टर, पोलीस, पत्रकार यांच्याप्रती पण आपण देणं लागतो या उद्दात्त हेतूने त्यांनी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, दौंडचे सर्व पदाधिकरी आणि सदस्य यांची त्यांनी कोविड पॉलिसी काढत सामाजिक बांधीलकी जपली. दीपक मोतीराम चौधरी यांनी विविध क्षेत्रांत काम करत असताना सामाजिक बांधीलकी जपत समाजसेवा ही अविरतपणे सुरूच ठेवली आहे.

शब्दांकन : विनोद गायकवाड, कुरकुंभ

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.