Sports Ministry’s Mission Olympic Cell – केंद्रीय क्रीडा मंत्रालय मिशन ऑलिंपिक सेल यांच्याकडून काही भारतीय खेळाडूंना सरावासाठी तसेच आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी परदेशात जाण्याची परवानगी देण्यात आली आहे. यानुसार महाराष्ट्राची टेबल टेनिस खेळाडू दीया चितळे व नेमबाज रुद्रांक्ष पाटील यांच्या विनंतीला मान्यता देण्यात आली आहे.
दीया चितळे ( Table tennis player Diya Chitale ) शिन मिन सुंग यांच्या मार्गदर्शनाखाली दक्षिण कोरियामध्ये सरावाला जाणार आहे. तसेच रुद्रांक्ष पाटील ( shooter Rudranksh Patil ) आंतरराष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत सहभागी होण्यासाठी डॉर्टमंड येथे रवाना होणार आहे.
या दोघांसह टेबल टेनिस खेळाडू स्वस्तिका घोष, जी. साथियान, मनिका बत्रा, बॅडमिंटन खेळाडू किरण जॉर्ज, अनुपमा उपाध्याय, ट्रीसा जॉली – गायत्री गोपीचंद यांच्याही मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत.