Burgdorfer Stadthaus Open Chess Tournament | भारतीय वंशाचा अश्वथ कौशिक ( Ashwath Kaushik ) फक्त आठ वर्षांचा आहे, पण या वयातही त्याने एका ग्रँड मास्टरला बुद्धिबळाचे धडे दिले आहेत. सिंगापूरच्या या मुलाने बर्गडोरफेर स्टेडथास खुल्या बुद्धिबळ स्पर्धेत (Burgdorfer Stadthaus Open Chess Tournament) पोलंडच्या ग्रँड मास्टर जासेक स्टोपाचा पराभव करून संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेतले. क्लासिकल चेसमध्ये ग्रँड मास्टरला पराभूत करणारा अश्वथ हा सर्वात तरुण खेळाडू ठरला आहे. स्टोपा 37 वर्षांचा आहे आणि अश्वथपेक्षा 29 वर्षांनी मोठा आहे.
मागील विक्रम काही आठवड्यांपूर्वी सर्बियाच्या लिओनिड इव्हानोविकने बेलग्रेड ओपनमध्ये 60 वर्षीय बल्गेरियन जीएम (ग्रँड मास्टर) मिल्को पॉपशेवचा पराभव केला होता. इव्हानोविक अश्वथपेक्षा अनेक महिन्यांनी मोठा आहे. अश्वथचे सध्याचे FIDE रँकिंग 37,338 आहे. तो भारतीय नागरिक असून 2017 मध्ये भारतातून सिंगापूरला आला होता.
Virat Kohli : ‘विराट-अनुष्का’ने मुलाचे नाव ठेवले ‘अकाय’, जाणून घ्या…. ‘Akaay’ चा नेमका अर्थ काय?
“मी ज्या पद्धतीने खेळलो त्याचा मला अभिमान वाटतो”, असे अश्वथ म्हणाला. तसेच सिंगापूर चेस फेडरेशनचे सीईओ आणि ग्रँडमास्टर केविन गोह अश्वथच्या यशाने उत्साहित आहेत. गोह यांना आशा आहे की, अश्वथच्या यशामुळे आणखी अनेक मुलांना बुद्धिबळ खेळण्यासाठी प्रेरणा मिळेल. गोहच्या मते, अश्वथचे पुढील लक्ष्य त्याचे रेटिंग सुधारणे आणि कैंडिडेट मास्टर्सचे विजेतेपद जिंकणे आहे.
दरम्यान, 2022 मध्ये 8 वर्षाखालील क्लासिक, रॅपिड आणि ब्लिट्झ या तिन्ही प्रकारांमध्ये तो पूर्व आशिया युवा चॅम्पियन बनला तेव्हा अश्वथ पहिल्यांदा प्रकाशझोतात आला होता.