मुंबई – परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा हे गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहेत. काही दिवसांपासून एक चर्चा जोर धरू लागली की, परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा हे दोघे एकमेकांना डेट करत आहेत. अनेकदा मुंबईमध्ये परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांना स्पाॅट केले गेले. पण परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांनी त्यांच्या नात्यावर कधीच भाष्य केले नाही.
मात्र, आता हे दोघे लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत. आज (दि. 13) अभिनेत्री परिणीती चोप्राने राघव चड्ढासोबत साखरपुडा केला असून, येत्या दोन दिवसांमध्ये हे दोघे आपल्या लग्नाची गाठ बांधणार आहेत.
View this post on Instagram
जवळचे मित्र आणि कुटुंबातील सदस्यांच्या उपस्थितीत हा सोहळा दिल्लीत पार पडला. या सोहळ्याला प्रियांका चोप्रा आणि मनीष मल्होत्रा यांसारख्या शोबिज जगतातील काही दिग्गजांनीही हजेरी लावली होती. परिणीती आणि राघवच्या साखरपुड्याचे पहिले फोटो समोर आले आहेत.
अत्यंत राॅयल स्टाईलमध्ये परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा हे दिसले. चाहते आता यांच्या लग्नाची आतुरतेने वाट पाहताना दिसत आहेत. परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा या दोघांनीही त्यांच्या साखरपुड्याचे फोटो शेअर केले आहेत आणि फोटोंमध्ये दोघेही खूप सुंदर दिसत आहेत.