पनवेलमध्ये मनसे कार्यकर्त्यावर जीवघेणा हल्ला

पनवेल – पनवेल महापालिकेतील भाजप नगरसेवक विजय चिपळेकर यांनी मनसे कार्यकर्ते प्रशांत जाधव यांच्यावर जीवघेणा हल्ला केल्याचा धक्‍कादायक प्रकार उघडकीस आला आहे. हा हल्ला आठ ते दहा गुंडांसोबत स्वतः नगरसेवक विजय चिपळेकर यांनी प्रशांत जाधव यांच्यावर केला. ही घटना मध्यरात्री 12 वाजता घडलेली असून ती सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

या हल्ल्यानंतर विजय चिपळेकर आणि त्यांचे गुंड साथीदार फरार झाले आहेत. या हल्ल्यात प्रशांत जाधव गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पनवेल मनपा निवडणुकीत नगरसेवक विजय चिपळेकर यांच्या कार्यकर्त्यांना पैसे वाटताना पकडण्यात आले होते. मनसे कार्यकर्ता प्रशांत जाधव यांनी आपले पैसे पकडून दिल्याच्या रागातून हा हल्ला करण्यात आल्याचे समजते.
हा हल्ला 29 एप्रिल रोजी मतदान संपल्यानंतर प्लॅनिंगने करण्यात आला आहे. याप्रकरणी कामोठे पोलीस स्टेशनमध्ये मारहाण करणाऱ्या भाजप नगरसेवकासह नऊ जणांवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.