आता आसारामवर साकारणार बायॉपिक?

बॉलिवुडमध्ये काही वर्षांपासून बायॉपिक चित्रपटांना चांगले यश मिळत आहे. आतापर्यत अनेक दिग्गज अभिनेता-अभिनेत्री, राजकारणी आणि खेळाडूंवर बायॉपिक चित्रपट साकारण्यात आले आहे. आता चर्चा आहे ती बलात्कारप्रकरणी कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या आसाराम याच्यावरील बायॉपिक चित्रपटाची.

“द ऍक्‍सिडेंटल प्राइम मिनिस्टर’चे निर्माता सुनील बोहरा हे हा चित्रपट साकारण्याचे प्लानिंग करत आहेत. सुनील मजूमदार यांच्या “गॉड ऑफ सिन ः द कल्ट, द क्‍लाउट ऍण्ड डाउनफॉल ऑफ आसाराम बापू’ या कादंबरीवर आधारित हा चित्रपट असणार आहे. हा चित्रपट बनविण्याचे राइट्‌सही बोहरा यांनी गतमहिन्यात खरेदी केले आहेत. या कादंबरीत आसाराम याच्या उत्थानपासून 2013मधील बलात्काराच्या आरोपनंतर झालेले पतनापर्यतची कथा लिहिण्यात आली आहे.

याबाबत सुनील बोहरा म्हणाले, मी ते पुस्तक वाचले आहे. तसेच बलात्कार पिडीत मुलीची विना फी घेता केस लढवून तिला न्याय देणा-या पी. सी. सोलंकी यांनीही मला प्रभावित केले आहे. या प्रकरणाशी संबंधित सुरत आणि जोधपुर कारागृहातील दोन महिला पोलीस अधिका-यांनीही मला या बायॉपिकसाठी प्रोत्साहन दिले आहे, असे त्यांनी सांगितले.

दरम्यान, चित्रपटातील कोणतेही कलाकार अद्याप निश्‍चित करण्यात आलेले नाहीत. पण लवकरच चित्रपटाची स्क्रिप्ट तयार झाल्यानंतर कलाकार निश्‍चित करण्यात येतील, असे सुनील बोहरा म्हणाले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.