नवी दिल्ली – भारताचा पारंपरिक प्रतिस्पर्धी आणि दहशतवाद्यांसाठी मदत करणाऱ्या पाकिस्तानच्या नौदलाबाबत एका मोठा खुलासा झाला आहे. पाकिस्तानच्या नौदलात एका घातक पाणबुडीचा समावेश करण्यात आला असल्याचे समोर आले आहे. पाकिस्तानने आतापर्यंत ही पाणबुडी जगापासून लपवून ठेवली होती. मात्र, अखेर त्याचा खुलासा झाला आहे. पाकिस्तानच्या कराची येथील पीएनएस इक्बाल नेव्हल बेसवरही पाणबुडी तैनात करण्यात आली आहे.
या पाणबुडीची माहिती समोर आल्यामुळे भारताची चिंता वाढली आहे. या पाणबुडीच्या माहितीनंतर नौदल अधिकच सतर्क झाले आहे. पाकिस्तानच्या नौदलाला भारतीय नौदलाने 1971 च्या युद्धात पाणी पाजले होते. त्यावेळी अमेरिकेच्या मदतीने पाकिस्तानने आपली ताकद वाढवली होती. या युद्धात भारताचे लष्कर, हवाई दल आणि नौदल हे तिन्ही सैन्य युद्धात सहभागी झाले होते.
अमेरिकेतील फोर्ब्सच्या वृत्तानुसार, पाकिस्तानची नेव्ही सील या पाणबुडीचा वापर करते. या पाणबुडीचे नाव एक्स क्राफ्ट आहे. या पाणबुडीबाबत पाकिस्तानने कमालीची गुप्तता बाळगली आहे. या पाणबुडीचा उल्लेख, नोंद कोणत्याही दस्ताऐवजात नाही. फोर्ब्सनुसार या पाणबुडीची माहिती जगासमोर पहिल्यांदाच आली आहे. पाकिस्तानने एक्स क्राफ्ट बद्दल गुप्तता बाळगल्यामुळे त्याची माहिती फारसी समोर आली नाही.
पाकिस्तानने गुप्त ठेवलेली आणि इटलीकडून घेतली ही पाणबुडी आकाराने लहान असली तरी खूप घातक आहे. ही पाणबुडी खास स्पेशल फोर्सेसच्या कामासाठी बनवण्यात आली आहे. या पाणबुडीचा आकार 55 फूट लांब आणि 7 ते 8 फूट रुंद आहे. पाणबुडी एक्सक्राफ्टच्या वापराबाबतचा निर्णय पाकिस्तानच्या स्पेशल सर्व्हिस ग्रुपकडून (एसएसजीएल) घेण्यात येतो. एसएसजीएल हे अमेरिकेच्या नेव्ही सीलसारखे काम करते. त्यामुळेच त्यांना पाकिस्तानी नेव्ही सील म्हटले जाते. पाकिस्तानच्या एसएसजीएलला मागील अधिक काळापासून अमेरिकेच्या नेव्ही सीलकडून प्रशिक्षण दिले जात आहे.