“मास्क’ प्रकरणात ‘चीन’ने फिनलंडलाही फसवले

हेलसिन्की : जगाला कोरोना विषाणूची “भेट’ देणाऱ्या चीनने वैद्यकीय उपकरण पुरवठ्यात जगाची फसवणूक केल्याचे उघड होत आहे. आता असाच प्रकार चीनने फिनलंडसोबत केला आहे. फिनलंडने चीनकडून मागविलेल्या 20 लाख सर्जिकल मास्क आणि 2.30 लाख रेस्पिरेटर मास्कचा चीनने दुय्यम दर्जाचा माल पुरवून फिनलंडला कोट्यवधींचा चुना लावल्याचे फिनलंड आरोग्य विभागाच्या प्रवक्‍त्या किरसी वर्हीला यांनी सांगितले आहे.

आम्ही मागविलेला माल अगदीच सुमार दर्जाचा आहे आणि त्यामुळे डॉक्‍टर, नर्स व अन्य आरोग्य कर्मचारी ते वापरू शकत नसल्याचे किरसी वर्हीला म्हणाल्या. चीनच्या वैयक्तिक सुरक्षा उपकरणांना सध्या कोव्हिड-19 मुळे जगभरातील देशांकडून मोठी मागणी असताना, चीन मात्र दुय्यम दर्जाचा माल पुरवून लक्षावधी डॉलर्सची कमाई करीत असल्याचे आरोप होत आहेत. यापूर्वी स्पेन, नेदरलंड, तुर्कस्तान, नेपाळ आणि ऑस्ट्रेलियाने हीच तक्रार केली आहे.

फिनलंडच्या आरोग्य मंत्री एनो का इसा पेकोनन यांच्या म्हणण्यानुसार एन-15 मास्क डॉक्‍टर्स आणि नर्स यांच्या वापरासाठी आवश्‍यक आहेत. ऑर्डर देताना पूर्ण रक्कम अगोदर भरावी लागते. त्याप्रमाणे आम्ही ऑर्डर दिली आणि पहिली खेप मिळाली. पण, त्यातील ऑर्डर केलेला माल प्रत्यक्षात दुय्यम दर्जाचा असल्याचे दिसून आले. त्यामुळे आम्ही निराश झालो आहोत. यापुढे चीनशी कोणत्याही प्रकारचा व्यापार न करण्याचे आम्ही आता ठरवत आहोत, असेही ते म्हणाले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.