इस्लामाबाद – पाकिस्तानमध्ये गेल्या काही दिवसांपासून वेगवान राजकीय घडामोडी सुरू होत्या. त्याचा पहिला अंक शनिवारी मध्यरात्री पाकिस्तानच्या संसदेतील हाय व्होल्टेज ड्रामाने संपला.
संसदेतील हाय व्होल्टेज ड्रामाचा घटनाक्रम
– शनिवारी रात्री उशीरा पाकिस्तानच्या संसदेमध्ये इम्रान खान यांच्याविरोधातील अविश्वास ठराव मंजूर करण्यात आला.
– पाकिस्तानच्या संसदेतील तब्बल १७४ सदस्यांनी इम्रान खान यांच्याविरोधात मतदान केले.
– यामुळे इम्रान खान पाकिस्तानच्या पंतप्रधानपदावरून पायउतार होणार असल्याचं स्पष्ट झालं.
– अशा प्रकारे अविश्वास ठरावाद्वारे पदावरून हटवण्यात येणारे इम्रान खान पाकिस्तानचे पहिले पंतप्रधान ठरले.
शेहबाज शरीफ नवे पंतप्रधान?
इम्रान खान पायउतार होणार असल्याचं स्पष्ट झाल्याने पाकिस्तानी संसदेतील विरोधी पक्षनेते शेहबाज शरीफ हे पाकिस्तानचे नवे पंतप्रधान बनणार असल्याचं जवळपास निश्चित झालं आहे. ते पाकिस्तान मुस्लीम लीग-नवाज गटाचे अध्यक्ष आहेत.
– रविवारी दुपारी २ वाजता पंतप्रधानपदी निवड करण्यासाठी मतदान होणार असल्याची देखील माहिती देण्यात आली आहे.