धनकवडी – बारामती लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा अजित पवार यांनी गुरुवारी (दि. 2) धनकवडी परिसरात जोरदार शक्तीप्रदर्शन केले. धनकवडी परिसरात भव्य अशी पदयात्रा काढण्यात आली.
या पदयात्रेत सुनेत्रा पवार यांच्यासह आमदार भीमराव तापकीर, भाजपच्या राष्ट्रीय प्रवक्या शायना एनसी यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या पदयात्रेस महायुतीचे पदाधिकारी, नेते, कार्यकर्त्यांसह नागरिक उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते.
दरम्यान, सुनेत्रा पवार यांनी गुरुवारी (दि. 2) प्रचार दौर्याला कोथरूडमधील कमिन्स इंडिया लिमिटेड कंपनीच्या कामगारांशी संवाद साधत केली. यावेळी त्यांनी कामगारांच्या अडचणी समजून घेतल्या व त्यावर आपण एकत्र मिळून सर्व तोडगा काढू असा विश्वास व्यक्त केला. या वेळी कामगारांनी उत्स्फूर्तपणे सुनेत्रा पवार यांना पाठिंबा दिला. यावेळी महायुतीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.