बारामती, (प्रतिनिधी) – जागतिक कामगार दिनाच्या निमित्ताने महावितरण बारामती परिमंडलातील 75 वीज कर्मचार्यांचा मुख्य अभियंता सुनिल पावडे यांच्या हस्ते गौरव करण्यात आला आहे. यामध्ये 13 यंत्रचालक तर 62 तारमार्ग कर्मचार्यांचा समावेश आहे.
24 एप्रिल 2024 रोजी मोरगाव येथे झालेल्या रिंकू बनसोडे हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर कामगार दिन अत्यंत साधेपणाने साजरा करण्यात आला. सुरुवातीला दिवंगत रिंकू बनसोडे यांना श्रद्धांजली अर्पण करुन पुरस्काराचे वाटप करण्यात आले.
पुरस्कारासाठी विभागातून एका यंत्रचालकाची तर उपविभागातून एका वीज कर्मचार्याची निवड करण्यात आली. त्यानुसार अनुक्रमे 13 यंत्रचालकांना व 62 तारमार्ग कर्मचार्यांना पुरस्कार मिळाले. यावेळी मुख्य अभियंता सुनिल पावडे, अधीक्षक अभियंता चंद्रशेखर पाटील, कार्यकारी अभियंता संजय गायकवाड व विजय सूर्यवंशी, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी श्रीकृष्ण वायदंडे यांची उपस्थिती होती.