Rahat Fateh Ali Khan – पाकिस्तानी गायक राहत फतेह अली खानचा एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. ट्विटरवर मारहाणीचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये गायक राहत फतेह अली खान नोकराला चप्पलने मारहाण करताना दिसत आहे, व्हिडिओत टेबलावर ठेवलेली दारूची बाटली कुठे गेली? असं ते नोकराला विचारत मारहाण करत आहे.
या कथित व्हिडिओमध्ये राहातने नोकराचे केस पकडून ठेवले आणि नंतर हातातल्या चप्पलने त्याच्या डोक्यावर जोरदार मारहाण केल्याच व्हिडिओमध्ये दिसत आहे. नोकर घाबरून तिथून निघून गेल्यावर ते त्याच्याजवळ जातात आणि मग दारूची बाटली कुठे गेली अस विचारतो.
Famous singer Rahat Fateh Ali khan beating his servent for bottle of Alcohol pic.twitter.com/9DZwYxgPmV
— Ghulam Abbas Shah (@ghulamabbasshah) January 27, 2024
यावेळी राहत फतेह अली खान पुन्हा त्याचे केस पकडतो आणि तिला मारायला लागतो. एकमेकांना मारताना ते खाली पडतात. शेजारी उभे असलेले इतर लोक त्याला उचलून घेतात, पण तो नोकराला मारहाण करणे थांबवत नाही. नोकराची विचारपूस करत असताना राहत त्याला खोलीच्या दरवाजाजवळ आणतो आणि पुन्हा मारहाण करू लागतो.’
या व्हिडिओवरून ट्रोल होताच राहतने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये तो सुरुवातीला,’नोकराची माफी मागतो, नंतर म्हणतो की, तुम्ही पाहिलेल्या व्हिडिओमध्ये गुरु आणि शिष्य यांच्यातील परस्पर संबंध आहे. माझ्या पाठीशी उभा आहे माझा शिष्य. गुरु आणि शिष्य यांचे नाते असे आहे की जेव्हा शिष्य चांगले काम करतो तेव्हा त्याच्यावर प्रेम केले जाते आणि जेव्हा त्याने चूक केली तेव्हा त्याला फटकारले जाते.’