अभिनेता आमिर खानला इंडस्ट्रीत मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणूनही ओळखले जाते. आमिर खानने त्याच्या कारकिर्दीत अनेक चित्रपट केले आणि तो एकमेव स्टार आहे जो पात्र साकारण्यासाठी नेहमीच आपले शंभर टक्के स्किलचा वापर करतो. ‘दंगल’साठी त्याने वजन वाढवले होते आणि ‘पीके’साठी त्याने कपड्यांशिवाय शूट केले होते. लोक आमिरला त्याच्या कामासाठी परफेक्शनिस्ट मानतात, पण आता त्याने सांगितले की त्याला हे नाव शबाना आझमीमुळे मिळाले आहे.
सध्या आमिर खान ‘लापता लेडीज’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे,याशिवाय आमिर पहिल्यांदाच कपिल शर्माच्या शोचा भाग बनला होता. गेल्या शनिवारी प्रसारित झालेल्या ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’ मध्ये आमिर खान पाहुणा म्हणून आला होता, जिथे त्याने अनेक मनोरंजक गोष्टींबद्दल बोलले
त्याने सांगितले की,’शबाना आझमी यांनी मला एक प्रश्न विचारला होता, त्यानंतर हे नाव प्रसिद्ध झाले. आम्ही एका स्क्रिपवर काम करत होतो. यावेळी मी कामात मग्न होतो, माझे संपूर्ण लक्ष कामावर होते. या दरम्यान, शबानाने चहासाठी मला विचारले त्यावेळी मी साखर किती टाकावी यासाठी चहाचा कप आणि साखरेचा चमचा किती मोठा आहे याबाबत विचारले. आणि त्यानंतर चहात किती साखर हवी हे सांगितले, मी कामात व्यस्त असतांना सुद्धा मी साखर किती टाकावी यासाठी विचारपूस केली त्यावेळी शबानाने मला मिस्टर परफेक्शनिस्ट म्हटले. मला हे नाव सर्वात शबानाने दिले. असेही त्याने सांगितले.
हेही वाचा
काजोलवर चाहत्याने लगावला गैरवर्तनाचा ‘आरोप’