पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान ‘या’ फोटोमुळे ट्रोल

‘भिकारी’ सर्च केल्यानंतर येतोय इम्रान खान यांचा फोटो

नवी दिल्ली : कलम 370 रद्द केल्याने भारताचा शेजारील देश पाकिस्तानचा चांगलाच तिळपापड झाला आहे. त्यातच हा मुद्दा पाकने आंतरराष्ट्रीय स्तरावर नेवून स्वत:चीच नाचक्‍की करून घेतल्याचेही जगाने पाहिले आहे. त्यातच आता जगप्रसिद्ध सर्च इंजिन ‘गुगल’वर सध्या पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान ट्रोल होताना दिसत आहेत. गुगलवर भिकारी हा शब्द सर्च केल्यास चक्क पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचा फोटो दिसत आहे. हाच फोटो सध्या सोशलमीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. दरम्यान, या फोटोत इम्रान यांची दाढी वाढलेली असून त्यांच्या हातात भिकेचा कटोरा दिसत आहे. त्यामुळे नेटीझन्सने त्यांना आता ट्रोल करण्यास सुरूवात केली आहे.

गुगलवर भिकारी शब्द सर्च केल्यास इम्रान खान यांचा मॉर्फ्ड केलेला फोटो सुरूवातीला दिसत आहे. विशेष म्हणजे, इम्रान यांच्या या फोटोला नेटीझन्सने चांगलेच ट्रोल केले आहे. गुगलवर इम्रान यांचे अनेक फोटो दिसून येतात. मात्र, भिकारी या नावाने सर्च केल्यास, एका फोटो चक्क भिकारीच्या वेशातील दिसत आहे. त्यामुळे, भारतीय युजर्संकडून हा फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल करण्यात येत आहे.

विशेष म्हणजे पाकिस्तानच्या ट्‌विटर आणि फेसबुक युजर्संने याप्रकाराबद्दलही भारतालाच जबाबदार धरले आहे. गुगलचे सीईओ सुंदर पिचई यांनीच जाणीवपूर्वक हा खोडसाळपणा केल्याचं पाकिस्तानी नेटीझन्सचे म्हणणे आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×