नवी दिल्ली – काही दिवसांपूर्वीच बीसीसीआयने ‘महिला प्रीमियर लीग’च्या पहिल्या सत्रासाठी मुंबईत लिलाव आयोजित करण्यात आला होता. यावेळी बीसीसीआयने महिला प्रीमियर लीगचे वेळापत्रकही जाहीर केले होते. महिला प्रीमियर लीगच्या या पहिल्या सत्रात एकूण 20 लीग सामने आणि 2 प्लेऑफ सामने 23 दिवसांच्या कालावधीत खेळवले जातील. मुंबईचे डी.वाय पाटील स्टेडियम आणि ब्रेबॉर्न स्टेडियममध्ये 11-11 सारखेच सामने होतील. तर, 26 मार्च रोजी ब्रेबॉर्न स्टेडियमवर अंतिम सामना खेळवला जाईल.
दरम्यान, महिला प्रीमियर लीगचा पहिला सामना 5 मार्च रोजी नवी मुंबईतील डी.वाय पाटील स्टेडियमवर खेळण्यात आला होता. त्यानंतर आता नेहमी प्रमाणेच पाकिस्तान क्रिकेट बोर्डने बीसीसीआयची कॉपी केल्याचं दिसून आलं आहे. भारतात बीसीसीआयने वुमन्स प्रिमियर लीग स्पर्धेचं आयोजन केलं होतं.
त्यानंतर पाकिस्तानच्या धर्तीवर देखील ‘पाकिस्तान वुमन्स लीग’ या स्पर्धेचं आयोजन केले आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने ट्वीट करत याबाबतची माहिती दिली आहे. त्यामुळे आता नेटकऱ्यांनी पाकिस्तानची चांगलीच खिल्ली उडवण्यास सुरुवात केली आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डने पाकिस्तान वुमन्स लीग स्पर्धेचं आयोजन केले असून, या स्पर्धेसाठी दोन संघ निवडण्यात आले आहे.
Game face 🔛
Preparations in full swing for the Women’s League exhibition games 🏏#LevelPlayingField pic.twitter.com/mHkOjbjkhS
— Pakistan Cricket (@TheRealPCB) March 6, 2023
एका संघाचं नाव ‘अमेजन’ आहे तर दुसऱ्या संघाचं नाव ‘सुपर वुमन्स’ असे ठेवण्यात आले आहे. या संघाचे वेळापत्रक देखील त्यांनी आपल्या ट्विटर आकाउंटवर शेअर केले आहे. दोन्ही संघामध्ये तीन सामने खेळवण्यात येणार आहेत. ‘बिस्माह मरूफ’ ही अमेजन संघाची कर्णधार आहे तर ‘सुपर वुमन्स’ संघाची कर्णधार निदा दार आहे.
हे क्रिकेटचे सामने रावळपिंडीमध्ये खेळवण्यात येणार आहेत. मात्र, असे असले तरी नेटकऱ्यांनी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाची चांगलीच खिल्ली उडवली असल्याचं पाहायला मिळत आहे. या संदर्भातील अनेक मिम्स सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत.