एयर स्ट्राईकदरम्यान पाक सैनिकांचा मृत्यू झाला नाही – सुषमा स्वराज 

नवी दिल्ली – बालाकोटमध्ये केलेल्या हवाई हल्ल्यात कोणत्याही पाकिस्तानी सैनिक अथवा नागरिकांना नुकसान पोहचले नाही, असे परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी सांगितले आहे. भाजप कार्यकर्त्यांना संबोधित त्यांनी हे वक्तव्य केले आहे.

सुषमा स्वराज यांनी म्हंटले कि, भारतीय सैनिकांना ऑपरेशनसाठी पूर्ण सूट देण्यात आली होती. आणि निर्देश देण्यात आले होते कि यादरम्यान कोणत्याही पकिस्तानी नागरिकाचा मृत्यू झाला नाही पाहिजे एवढेच नव्हे तर पाकिस्तानी सैनिकांनाही कोणतेही नुकसान पोहचू नये. केवळ जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवादी तळांना लक्ष्य बनविण्यात यावे. त्या पुढे म्हणाल्या, हा हवाई हल्ला आत्मसुरक्षेसाठी असल्याचे आंतरराष्ट्रीय समुदायाला सांगण्यात आले होते. त्यामुळे जगभरातून भारताला हल्ल्याचे समर्थन मिळाले, असे त्यांनी सांगितले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.