नवी दिल्ली – भारतीय संघाने पाकिस्तानचा ९० धावांनी दणदणीत पराभव केला. या पराभवावर पाकचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर चांगलाच नाराज झाला आहे. पाकिस्तान संघाचा कर्णधार सरफराज याच्याकडे डोकं नसल्याची टीका शोएब अख्तरने केली आहे. शोएबने आपल्या युट्युब चॅनेलवर पाकिस्तानच्या प्रत्येक खेळाडूवर सडकून टीका केली.
शोएब अख्तर म्हणाला कि, टॉस जिंकल्यानंतर पाकिस्तानने फलंदाजी करण्याच्या निर्णय घेतला पाहिजे होता. इतिहासानुसार, भारताच्या आव्हानांचा विजयी पाठलाग पाकिस्तान आतापर्यंत कधीच करू शकलेला नाही. तरीही पाकच्या कर्णधाराने पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तो पुढे म्हणाला, आमचे व्यवस्थापनच बेवकूफ आहे. आणि व्यवस्थापनसमोर कर्णधार काहीच करू शकत नाही. १० वीच्या वर्गातील विद्यार्थ्याप्रमाणे आहे ज्याला म्हंटले जाते जा करून ये, असे त्यांनी म्हंटले.
हसन अलीवर निशाणा साधताना शोएब अख्तर म्हणाला, त्याला केवळ टी-२० च खेळता येते. बाबर आजमला काही न करता मोठा फलंदाज बनविण्यात आले आहे. तर इमाम-उल-हकला कवर ड्राइव्ह खेळता येत नाही. पाकिस्तानची सेमीफायनलमध्ये जाण्याची संधी जवळपास संपुष्टता आल्याचीही शोएब अख्तरने म्हंटले आहे.