Praniti Shinde । एकाच वेळी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देणारा जिल्हा म्हणून सोलापूरची ख्याती आहे. प्रत्येक लोकसभा निवडणुकीत सोलापूर मतदारसंघाकडे राज्याचे लक्ष असते. सोलापूरला काँग्रेसचा गड म्हणून ओळखले जायचे, पण मागील दोन निवडणुकीत येथे भाजपने बाजी मारली.
सोलापूर मतदारसंघात लिंगायत, मराठा आणि मागसवर्गीय या तीन मताला मोठी किंमत आहे. सहा विधानसभा क्षेत्रांचा मिळून सोलापूर लोकसभा मतदारसंघ तयार झाला आहे. दरम्यान सोलापूर मतदारसंघातून काँग्रेस पक्षाच्या नेत्या प्रणिती शिंदे यांना तिकीट मिळणार असल्याची चर्चा रंगली आहे. तर भाजपने सोलापुर लोकसभेसाठी उमेदवार निश्चित केल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
Praniti Shinde । भाजप कडून कोणाला मिळणार तिकीट
-सोलापूर लोकसभेसाठी भाजपकडून पद्मश्री आणि उद्योजक मिलिंद कांबळे यांचे नाव जवळपास निश्चित झाल्याची माहिती मिळत आहे. -मिलिंद कांबळे हे डिक्की अर्थात दलित चेंबर ऑफ कॉमर्सचे संस्थापक अध्यक्ष आहेत.
-2013 साली त्यांना राष्ट्रपती प्रवण मुखर्जी यांच्या हस्ते पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
-मिलिंद कांबळे हे मूळचे लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील रहिवासी आहेत.
-मागील अनेक वर्षांपासून ते इन्फ्रास्ट्रक्चर क्षेत्रात काम करत आहेत.
-काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांना टक्कर देण्यासाठी एक प्रतिष्ठित आणि उच्चशिक्षित चेहरा म्हणून भाजपकडून मिलिंद कांबळे यांना लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवले जाण्याची शक्यता आहे.
हे वाचले का ? ‘साहेबांनी आदेश दिला तर, मी गडचिरोलीतूनही निवडणूक लढवू शकतो’
Praniti Shinde । सोलापूर मतदारसंघाचा इतिहास
-एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला अशी ओळख असलेल्या सोलापूर लोकसभा मतदार संघाची ओळख होती. मतदारसंघ स्थापनेच्या 10 वर्षांनी सोलापुरात 1962 साली काँग्रेसचा उदय झाला. 1996 आणि 2003 या दोन निवडणुकांचा अपवाद वगळला तर 2014 पर्यंत काँग्रेसने निर्विवाद वर्चस्व राखले.
1996 मात्र काँग्रेसच्या विजयाचा रथ भाजपच्या लिंगराज वल्याळ यांनी पहिल्यांदा रोखला. लिंगराज वल्याळ यांच्या रूपाने केवळ सोलापूरचाच नाही तरं पश्चिम महाराष्ट्रातील पहिला खासदार भाजपला मिळाला. मात्र केंद्रात इंद्रकुमार गुजराल यांची सत्ता कोसळल्याने 1998साली पुन्हा एकदा देशात निवडणुका लागल्या.
याचं निवडणुकामध्ये सोलापूर लोकसभा मतदार संघाच्या माध्यमातून काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे यांची राष्ट्रीय राजकारणात एन्ट्री झाली. 1998 आणि 1999 साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत सुशीलकुमार शिंदे यांनी काँग्रेस तर्फे निवडणूक लढवत विजय मिळवला.
2003 साली सुशीलकुमार शिंदे हे राज्याचे मुख्यमंत्री झाले. त्यामुळे रिक्त झालेल्या सोलापूरच्या लोकसभा जागेसाठी पोटनिवडणूक लागली. या पोटनिवडणुकीत भाजपच्या प्रतापसिंह मोहिते पाटील यांनी बाजी मारली. त्यानंतर 2004 च्या लोकसभा निवडणुकीत भाजच्याच सुभाष देशमुखानी विजयश्री प्राप्त केला.