Raj Thackeray । लोकसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यानंतर देशभरातील राजकीय घडामोडींना वेग आलाय. त्यातच राज्यातील राजकारणातही सध्या वेगवेगळी समीकरणं जुळताना दिसून येतायेत. काल याच पार्श्वभूमीवर मनसे प्रमुख राज ठाकरे आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यात भेट झाली. या भेटीत आगामी लोकसभा निवडणुकीत मनसे महायुतीसोबत येण्यावर चर्चा झाली. दरम्यान, या भेटीत राज ठाकरेंनी महायुतीला दिलेला प्रस्ताव फेटाळण्यात आल्याचे बोलले जात आहे.
राज ठाकरेंकडून दोन जागेची मागणी Raj Thackeray ।
मागील काही दिवसांपासून आगामी लोकसभा निवडणुकीत भाजप , शिंदे आणि पवार यांच्या महायुतीत आता मनसेही सामील होणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. अशातच राज ठाकरे आणि अमित शाहा यांच्यात काल बैठक पार पडली. या बैठकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दोन जागा दक्षिण मुंबई आणि दक्षिण मध्य मुंबई मनसेला देण्यात यावी असा प्रस्ताव भाजपसमोर ठेवला होता.
राज ठाकरेंचा हा प्रस्ताव अमित शहांनी मात्र फेटाळला आहे. केवळ एक जागा देणं निश्चित, पण दुसरी जागा देणं कठीण असल्याचं अमित शाहांनी राज ठाकरेंना सांगितलं. तसेच, राज ठाकरेंनी लोकसभेनंतर कसं पुढे जायचं? या बद्दलही विचारणा केली. त्यावर, या घडीला कुठलीही कमिटमेंट देणं शक्य नाही, असेही अमित शाह राज ठाकरेंना म्हणाल्याची माहिती मिळत आहे.
विधानसभा देखील एकत्र लढवू पण …Raj Thackeray ।
विधानसभा देखील एकत्र लढवू पण तेव्हाचं जागावाटप तेव्हा ठरवू असंही अमित शाह म्हणाले. महत्त्वाचं म्हणजे, याआधी उद्धव ठाकरे यांच्यासोबत जे झालं त्याची पुनरावृत्ती व्हायला नको आणि म्हणूनच आता फक्त लोकसभा निवडणुकांसंदर्भात बोलू, विधानसभेचं विधानसभेला ठरवू अशी स्पष्ट भूमिका भाजप नेते अमित शाहांनी राज ठाकरेंसमोर मांडल्याची माहिती मिळत आहे.
हेही वाचा
“ठिगळ्या ठिगळ्यांची गोधडी म्हणजे भाजपा” ; राज ठाकरेंवरून ठाकरे गटाच्या ‘या’ नेत्याची सडकून टीका
राजकीय हालचालींना वेग; राज ठाकरे दिल्लीत, मनसे ‘या’ मतदारसंघाची करणार मागणी?