Owaisi on Congress-NCP। एमआयएमआयचे प्रमुख असुदुद्दीन ओवैसी यांनी राज्यातील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका केली आहे. त्यानी स्वतःला सेक्युलर म्हणवणारे दोन्ही काँगेस पक्षाने बाबरी मशिदीचा नाव उल्लेख करून दाखवावा असे आव्हान त्यांनी केलंय. तसेच राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाने उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री करून त्यांचा खरा चेहरा त्यांनी स्वतःहून सर्वांसमोर आणलाय असेही त्यांनी म्हटले.
..तर मी माझी मशिद कशी काय विसरणार? Owaisi on Congress-NCP।
पुढे त्यांनी,“काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे लोक तुमच्याकडे येतील तेव्हा त्यांना विचारा तुमच्यात बाबरीचं नाव घेण्याची हिंमत आहे का? स्वतःला सेक्युलर म्हणवणारे मला नावं ठेवतील. मी चिथावणीखोर भाषण करतो असं म्हणतील. पण मला सांगा मी तुम्हा सगळ्यांच्या मनातलं बोलतोय की नाही? हे उद्या मला सांगतील आता विषय संपवा, झालं ते झालं. तुम्ही जर तुमच्या आई वडिलांना विसरु शकत नसाल तर मी माझी मशिद कशी काय विसरणार?” असा सवाल ओवैसी यांनी केला आहे.
ये @INCIndia के, @NCPspeaks के और जितने सेक्युलर लोग हैं जब आपके पास आये तो उनसे एक ही सवाल पूछो क्या तुम अपनी ज़बान से बाबरी मस्जिद बोल सकते या नहीं बोल सकते ? pic.twitter.com/nWYSauLLpA
— Asaduddin Owaisi (@asadowaisi) February 19, 2024
६ डिसेंबर १९९२ कधीच विसरु नका Owaisi on Congress-NCP।
मला उद्या सांगितलं जाईल आता सोडून दे विषय ३० वर्षे होऊन गेली आहेत. ३० वर्षे नाही पुढची सगळी वर्षे ६ डिसेंबर १९९२ विसरु नका. ६ डिसेंबर १९९२ विसरलात पुन्हा एकदा तो दिवस येऊ शकतो. त्यामुळे हा दिवस कधीच विसरु नका. ज्या ठिकाणी मशीद बनली, तिथे मशीद होती आहे आणि राहणार हे विसरु नका.
आम्ही बाबरीचे नाव संसदेत घेतलं आहे. जोपर्यंत कयामत येईल तोपर्यंत आम्ही हे सांगत राहणार. आम्ही अमित शाह यांच्यासमोर बाबरी जिंदाबादचे नारे दिले आहेत. आम्हाला काँग्रेस राष्ट्रवादीने काहीही शिकवू नये. बाबरी मशीद जिवंत होती आणि राहिल. तुमच्या हृदयात बाबरी आहे की नाही? मी तुमच्या मनातलं बोलतोय की नाही? तुमच्याकडे हे सगळे पोपटपंची करायला येतील. आता सगळं विसरा सांगतील. पण बाबरी विसरायची नाही हे लक्षात ठेवा असेही त्यांनी यावेळी म्हटले.